shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" संकटकाळी माणुसकीच्या नात्याने भटक्या विमुक्तांना सेवाभावी संस्थांचा आधार "


औरंगाबाद प्रतिनिधी:
देशामध्ये कोरोना व्हायरस मूळे सध्या आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. लाॅकडाऊनचा तिसरा टप्पा चालू आहे.त्यामुळे शासनाने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून दि. २२ मार्च पासून लॉकडाउन ची घोषणा केली आहे. या दरम्यानच्या काळात भटक्या विमुक्त समाजातील लोकांची बिकट अवस्था झाली त्यांची उपासमार होत असल्याचे अनेक फोन येऊ लागले.



म्हणून महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त संघर्ष समिती चे अध्यक्ष टी एस चव्हाण, उपाध्यक्ष के ओ गिर्हे व सचिव दुर्गादास गुढे समाज सेवेचे व्रत स्वीकारलेल्या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या संकटकाळी मदत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार आता पर्यंत जवळपास ५०० कुटुंबाना मदत देण्यात आली.बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे प्रशांत दंदे, रेड स्वास्तिक सेवाभावी संस्थेचे प्रमुख हेमंत गोरे, श्री गवळी, तसेच डॉ अरविंद गायकवाड कॅन्सर हॉस्पिटल चे प्रमुख, याच्या माध्यमातून  आंबेडकर फेस मूव्हमेंट चे प्रमुख विश्वदीप करंजीकर, वुई टुगेदर सेवाभावी संस्था ठाणे व प्रसिद्ध समाजिक कार्यकर्ते दिवाकर कुलकर्णी पळसकर, राजेंद्र राक्षे, प्रवीण सोनवणे यांनी उपासमार होत असलेल्या कुटुंबाना मदत केली. सापवाले मदारी सुंदरवाडी, झाल्टा फाटा , सेवनहिल परिसरातील शिकलंकरी व पाथरवट वडार समाज, वैदू समाज बिड-बायपास, सातारा परिसरातील डवरी गोसावी समाज, गेवराई तांडा जवळचे , डवरी गोसावी, चिखलठाणा येथील मसणजोगी समाज व नंदलाल धुत हॉस्पिटल जवळ वसलेल्या मरीआईवाले अशा जवळपास ५०० कुटुंबाना वरील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून फार मोठा आधार मिळाला.



त्या बद्दल महाराष्ट्र भटके विमुक्त संघर्ष समिती चे अध्यक्ष टी एस चव्हाण ,उपाध्यक्ष के ओ गिर्हे  व सचिव दुर्गादास गुढे यांनीं वरील सर्व सेवाभावी संस्थांचे आभार मानले.
या कार्यासाठी जेष्ठ पत्रकार सो.सो.खंडाळकर (दादा) यांनी मार्गदर्शन केले.
close