देवळाली प्रवरा - दि. 4
स्पर्धा परिक्षेसाठी दिल्लीत गेल्येल्या राज्यातील विद्यार्थ्याना घरी येण्यास परवानगी मिळावी यासाठी राहुरी तालुक्याचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे विनंती केली आहे.
ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांना लिहलेल्या ई मेल पत्रात म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील जवळपास 1500 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी दिल्ली मधे गेलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी राज्यात परत येण्यासाठी सर्व ऑनलाइन प्रक्रिया करीत आहेत. तथापी दिल्ली सरकारकडून त्यांना अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. दिल्ली सरकारच्या परवानगी अभावी हे सर्व विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. तरी अपणास विनंती की, सोबत जोडून सादर केलेल्या राज्यातील स्पर्धा परिक्षा अभ्यासक्रमातील मुलांची यादी तपासुन राज्यातील या 1500 विद्यार्थ्याना घरी येण्यासाठी दिल्ली सरकारसोबत आपण कृपया चर्चा विनिमय करावी. व या मुलांना राज्यात आणण्यासाठी तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी.
ढुस यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या माहीतीसाठी व पुढिल योग्य त्या कार्यवाही साठी या विद्यार्थ्यांची जिल्हा निहाय यादी जोडून सादर केली आहे.
मुख्यमंत्री यात नक्की लक्ष्य घालतील व लवकरच हे सर्व विद्यार्थी राज्यात परत येतील असा विस्वास आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केला.
आप्पासाहेब भिमराज ढुस,
शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कारार्थी - महाराष्ट्र शासन. तथा,
संपर्क समन्वयक - आपत्ती व्यवस्थापन, राहुरी.
रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी, जि. अहमदनगर 413716
मो. 9823035936