shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर; महावितरण चे नविन 25 विज मिटर कचरा कुंडीत..!!

देवळाली प्रवरा - दि. 01 जुन 2020
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या  देवळाली प्रवरा येथील सोसायटी चौकात श्रीरामपूर रोड लगत असलेल्या गुलदगड (बुवा) यांचे चहाचे हॉटेल लगत असलेल्या पत्र्याच्या टपरी मागे कचरा टाकतात तसे महवितरण चे 25  नविन विज मिटर टाकुन दिल्याचे आढळून आलेने महवितरण MSEB चा गलथांन कारभार समोर आला आहे.


       
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व त्यांचे श्रीरामपूर येथील एक मित्र देवळाली प्रवरा येथील  सोसायटी  चौकात या बुवा च्या हॉटेल जवळ बोलत उभे असताना ढुस यांचे या मिटर पडलेल्या जागेकडे सहज लक्ष गेले.. जवळ जावून पाहिले असता ते महावितरण कंपनीचे विज मिटर असल्याचे लक्षात आलेने ढुस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे महवितरणचे मुख्य अभियंता सांगळे यांना फोन करून सदर माहिती दिली.  सांगळे यांनी तात्काळ देवळाली प्रवरा चे उप अभियंता देहरकर  यांना घटनास्थळी पाठवून सर्व मिटर ची तपासणी करून पंचनामा केला. 
      
पंचनामा करताना एकुण 25 नग नविन मिटर आढळून आले. या सीरियल क्रमांकाचे नविन मिटर कार्यालयातून कोणी, कधी व कश्यासाठी ताब्यात घेतले होते या गोस्टीची सखोल चौकशी करून दोसींवर  कारवाई करण्यात येईल असे डेहरकर  यांनी आप्पसाहेब ढुस यांचेशी बोलताना सांगितले.
close