shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील राशन दुकानदारास पाठीशी घालणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.09 जुन,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथील राशन दुकानदारांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी सेनगांव तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे निवेदनाव्दारे दाद मागितली होती.परंतु पुरवठा अधिकारी यांनी खोटा अहवाल सादर करीत राशन दुकानदारास पाठीशी घातले आहे.पुरवठा अधिकारी यांची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज दि.09 जुन मंगळवार रोजी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी यांना ग्रामस्थ व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी निवेदन दिले आहे.


हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथील राशन दुकानदाराची मनमानी व राशनचा माल कमी देऊन चढ्या भावाने विक्री करणे,रितसर पावती न देणे,लाभार्थ्यास विचार न करता दमदाटी करणे,दादागिरीची भाषा वापरणे या प्रकरणाला वैतागुण ग्रामस्थांनी सेनगांव तहसिलदाराकडे निवेदन देऊन दाद मागितली होती.सदर प्रकरणाची पुरवठा अधिकारी यांच्यामार्फेत चौकशी करण्यात आली होती.यावेळी गावातील पिडीत ग्रामस्थांनी दुकानदार विरोधात गैरकारभाराचा पाढा वाचुन आपली व्यथा मांडली व आतातरी आपणास न्याय मिळेल असे वाटत असतांनाच पुरवठा अधिकारी यांनी सदर प्रकरणी खोटा अहवाल सादर करून मनमानी करणा-या राशन दुकानदारास पाठीशी घातले त्यात आर्थिक व्यवहार होऊन धनशक्तीचा विजय झाला असा आरोप ही ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे.तरी मनमानी करणा-या राशन दुकानदारास पाठीशी घालणा-या संबधीत पुरवठा अधिकारी यांची चौकशी करून या अधिका-यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी तहसिलदार  जीवकुमार कांबळे यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना केली आहे.या निवेदनावर मौजे ब्राम्हणवाडा येथील ग्रामस्थ व हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,युवासेना उपजिल्हाप्रमुख अनिल अगस्ती यांच्या स्वाक्ष-या आहेत.सेनगांव तालुक्यातील बहुतांश ठिकाणी राशन दुकानदार मनमानी कारभार करीत आहेत माल कमी देऊन चढ्या दराने राशन माल विक्री करून पावती ही दिल्या जात नसल्याचे सुज्ञ नागरीकातुन बोलल्या जात आहे.
close