shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार महामंडळाच्या कोपरगाव व राहाता तालुका अध्यक्षपदी अरूणाताई पळसे यांची एकमताने निवड..!!

महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार महामंडळाच्या कोपरगाव व राहाता तालुका अध्यक्षपदी अरूणाताई पळसे यांची एकमताने निवड..!!

सावळीविहीर ( राजकुमार गडकरी):
महाराष्ट्र राज्य पांचाळ सोनार समाज महामंडळाच्या राहता व कोपरगाव तालुका महिला अध्यक्षपदी सावळीविहिर तालुका राहाता येथील सौ. अरुणाताई कैलासराव पळसे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे पांचाळ सोनार महामंडळाचे अध्यक्ष धनंजयदादा शिरसागर, प्रकाशजी पोतदार , अमोल हिलाले, संतोष दीक्षित ,जिल्हाध्यक्ष अहमदनगर. यांच्यावतीने सौ. अरुणाताई पळसे यांना या निवडीचे पत्र देण्यात आले आहे .या पत्रात त्यांनी अरुणाताई कैलासराव पळसे यांची तडफदार महिला म्हणून कोपरगाव व राहता तालुकाध्यक्षपदी निवड केल्याचे म्हटले असून संत नरहरी महाराजांच्या कृपेने त्यांना समाजसेवा करण्याची चांगली संधी या पदाद्वारे मिळणार आहे.
      या निवडीबद्दल सावळीविहिर पंचक्रोशीत मोठा आनंद व्यक्त होत असून राहता तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती ओमेश साहेबराव जपे तसेच ग्रामपंचायत सदस्य नितीन  आगलावे ,अशिष आगलावे, आनंद जपे ,मधुकर वाघमारे, माजी उपसरपंच शांताराम जपे, पोलीस पाटील सुरेश वाघमारे अमोल दहिवाळ, निखिल कापसे, आदी सह अनेकांनी अरुणाताई कैलास पळसे यांचा या निवडीबद्दल सत्कार केला.
यावेळी बोलताना येथील माजी उपसरपंच शांताराम जपे म्हणाले की ,सौ अरुणाताई पळसे या खरोखर धडाडीच्या महिला असून त्यांनी ग्रामीण भागात महिला बचत गट व महिला संघटना यांच्या मार्फत विविध कामे समाजसेवा केले आहे व ते करत आहेत.तसेच पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे यांनीही अरुणाताई पळसे ह्या  धडाडीच्या व सर्व समाजात मिसळून काम करणाऱ्या महिला असून आतापर्यंत महिलांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठवत त्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात,असे यावेळी सांगितले. सत्कारानंतर बोलताना सौ. अरुणाताई कैलास पळसे म्हणाले की मला राज्य पदाधिकाऱ्यांनी तालुका अध्यक्षपद देऊन मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती मी पूर्ण विश्वासाने पार पाडीन. तसेच येणाऱ्या काळात मुली महिला तसेच ओबीसी समाजातील सर्वांसाठी मी सदैव त्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्न करेन, असे सांगून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे निवड केल्याबद्दल आभार मानले.
close