shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इतर समाजावरील अन्याय अत्याचाराविरोधात कडक कारवाईचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश



समाजकंटकांना गृहमंत्र्यांचा इशारा

मुंबई दि. 18 - महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. असा सज्जड इशारा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.



छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, दीनदुबळ्यांवर अन्याय अत्याचार होता कामा नये.

राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना जर राज्यात घडल्या तर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.
close