जिल्हाधीका-यांची शिर्डी येथील नियोजित कोव्हिड सेंटरला भेट..!!
सावळीविहीर (राजकुमार गडकरी):
श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील नियोजित कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी आज भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.
यावेळी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बापूसाहेब गाढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, डॉ.प्रमोद गायकवाड, साई संस्थान हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. नरवडे उपस्थित होते.येथेकोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचाराच्यादृष्टीने करण्यात आलेल्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करुन, आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत सर्व संबधितांना सूचना केली. राहाता तालुका व परिसरातील कोरोनाग्रस्त रुग्णांवर साई आश्रम येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी यावेळी दिले. तसेच रुग्णांवर उपचार करण्यासाठी तालुका प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले. कोविड केअर सेंटर येथे कारण्यात आलेल्या व्यवस्थेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बापूसाहेब गाढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोविड केअर सेंटरबाबत माहिती दिली. राहता व परिसरात तालुक्यात दिवसेंदिवस कोरोणाचे रुग्ण वाढत आहे. अशा रुग्णांवर येथेच औषध उपचार व्हावे यासाठी हे सेंटर मोठे उपयोगाचे ठरणार आहे, अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांनीराहाता तालुक्यातील इतरही गोष्टींचा आढावा घेतला, यावेळी महसूल आरोग्य ,पोलीस ,आदी, सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

