shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मिल्लतनगरच्या विविध नागरी समस्यांकडे, का नगरपालिकेचे दुर्लक्ष ? नागरीक झाले त्रस्त, शेवटी कधी होणार श्रीरामपूरची नगरपालिका दक्ष ??


श्रीरामपूर ( प्रतिनिधी) येथील प्रभाग क्र. १२ मध्ये नागरी सुविधांचा अभाव दिसत असून येथील नगरसेवकांचे व नगरपालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.मिल्लतनगरमध्ये  नगरपालिकेच्या बऱ्याच स्ट्रीट लाईट चालू नसतात तसेच बऱ्याच लाईटच्या खांबावर स्ट्रीट लाईट बसवलेली नसल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्र. १२ मधील नगरसेवकांची व नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांचे म्हणणे  असते की नागरपालिकेकडे निधी उपलबध नसल्याने स्ट्रीट लाईट उपलब्ध नाहीत असे सहा महिन्यांपासून सांगण्यात येत आहे, त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी लाईट खांबाचे अंतर जास्त असल्याने विद्यूत तारा या दहा ते बारा फुटांपर्यंत लोंबकळत आहेत त्यापासून केव्हाही मोठी दुर्घटना घडण्याची संभावना ही नाकारता येत नाही. 






नवजीवन हौसिंग सोसायटी येथील ज. इमदादसर यांच्या घरासमोरील विद्युत तारांपासून नक्कीच अपघात होण्याचा संभव जास्त आहे सध्या वाऱ्या पावसाचे दिवस असल्याने याठिकाणी भयंकर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नगर पालिकेच्या ट्रॅक्टरवरील चालक असिफ शेख यांच्या घरा शेजारील मोकळ्या प्लॉटमध्ये तर उकिर्ड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन मच्छरांचा प्रादूर्भाव वाढत आहे, कोरोनासारख्या आजाराला या प्रादूर.भावाची साथ पूर्णपणे मिळणार आहेत  यामध्ये शंकांचं नाही, तरी याभागातील नगरसेवकांनी व नगरपालिकेने प्रभाग क्र. १२ मध्ये लक्ष द्यावे व भविष्यात नवीन संकटास जन्म देणाऱ्या संकटाचा नायनाट करावा अशी मागणी येथील नागरीकांकडून केली जात आहे
close