shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डांगेचौक परिसरात रस्त्यावर थुंकणाऱ्या १०० जणांवर कारवाई; १५ हजारांचा दंड वसूल


पिंपरी-चिंचवड:
पिंपरी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेरगावमधील डांगेचौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणाऱ्या १०० जणांवर मंगळवार (दि.१६) अखेरपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रिय कार्यालयाच्या आोग्य विभागाकडून ही कारवाई १५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र २४ मध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. मंगळवार दि.१६ रोजीपर्यंत डांगेचौक परिसरात रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी १०० जणांवर कारवाई केली असून १५ हजार रुपये शासकीय दंड वसूल झाला आहे. ही कारवाई ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजु बेद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई प्रभाग क्रमांक २४ चे आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल, आरोग्य मुकदम दिलीप खताळ, कर्मचारी अभय दारोळे, प्रशांत पवार, अरुण राऊत, राजू जगताप, सूर्यकांत चाबुकस्वार, वजीर सौदागर यांच्या पथकामार्फत करण्यात आली.
close