हिंगोली/प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.08 जुन हिंगोली जिल्ह्यात नव्याने राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती केली जात आहे.यामध्ये राष्ट्रीय महामार्ग मालेगाव-रिसोड-सेनगांव-हिंगोली या शहरातुन हे काम चालु असुन पुर्णत्वाच्या वाटेवर आहे.मात्र सेनगांव ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर सेनगांव येथे ठिक-ठिकाणी भेग्या पडल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप युवक काॅग्रेसचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष जितु देशमुख यांनी केला असुन त्यांनी आज दि.08 जुन सोमवार रोजी काॅग्रेस पदाधिका-यासह काळ्या फिती लाऊन निषेध करीत या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करून उच्च दर्जाचे काम करण्याची मागणी केली आहे.
सेनगांव ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मातीमिश्रीत मुरूमाचा भरणा केल्याने हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असुन या महामार्गावरील सिमेंट रस्त्याच्या मधोमध मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या निकृष्ठ कामाची चौकशी करून संबधीत गुत्तेदारावर योग्य ती कार्यवाही करून हे काम परत उच्च दर्जाचे करण्याची मागणी युवक काॅग्रेसचे उप जिल्हाध्यक्ष जितु देशमुख,पं.स.सदस्य संतोष खोडके,मारोतराव खरात,अनिस शेख,ऊत्तम कवडे,सुनिल देशमुख आदी युवक काॅग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लाऊन निषेध व्यक्त करत आदोंलन केले.


