shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहाता तालुक्यात रूई कोहकी शिवारात ५५वर्षीय शेतकर्याचा आढळला खाणीमध्ये मृतदेह..!!

राहाता तालुक्यात रूई कोहकी शिवारात ५५वर्षीय शेतकर्याचा आढळला खाणीमध्ये मृतदेह..!!
सावळीविहीर ( राजकुमार गडकरी)
राहता तालुक्यातील सावळीविहीर जवळील रुई कोहकी येथे  एका 80 ते 90 फूट खोल पाण्यात खाणीमध्ये रुई येथील शेतकरी  नानासाहेब संपतराव गायकवाड वय वर्ष पंचावन्न यांचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ सावळीविहीर, रुई ,कोहकी परिसरात उडालीआहे.
राहता तालुक्यातील  रुई,कोहकी शिवारात असलेल्या एका  खाणीच्या कठड्यावरून पाय घसरून झोक जावुन पाण्यात पडल्याचा संशय मयत नानासाहेब गायकवाड यांच्या नातेवाईकांना आणि ग्रामस्थांनी व्यक्त।केला आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की ,राहता तालुक्यातील रुई कोहकी शिवारात 55 वर्षेीय शेतकरी नानासाहेब संपतराव गायकवाड हे गायब होते,त्यामुळे त्यांचा  शोध गावातील नातेवाईक मित्र ,ग्रामस्थ यांनी घेतला.मात्र ते सापडून न आल्याने व त्यांची माहिती मिळत नसल्याने त्यांनी शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपक गंधाले यांना ही माहिती दिली ,त्यानंतर पो नि,दीपक गंधाले  व त्यांच्या पथकाने तसेच शिर्डीच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी, गावात भेट देऊन आसपास शोध सुरू केला.
त्यावेळी रुई कोहकी शिवारातील एका 80 ते 90 खोल असणाऱ्या व पाणी असणाऱ्या।एका खोल खाणी जवळच कडेला  एक मोटर सायकल नं(MH17/R/653) व चपला आढळून आल्या, त्या नानासाहेब संपतराव गायकवाड यांच्याअसल्याचे ओळखताच उपस्थितांचा संशय बळावला व नंतर या खाणीतील पाण्यात त्यांचा शोध अग्निशामक दल यांच्या वतीने घेण्यात आला, त्यानंतर अथक परिश्रमानंतर ८ तासानंतर नानासाहेब संपतराव गायकवाड यांचा मृतदेह खाणीच्या पाण्यात फुगून वर आल्याने तो काढण्यात आला व  पंचनामा करण्यात आला.या घटनेची माहिती परिसरात समजतात मोठी खळबळ उडाली, सर्वजण हळहळकरताना दिसत होते.मयत नानासाहेब संपतराव गायकवाड हे शेतकरी व सावळीवीहिर येथे एका इंडस्ट्री कंपनीत  अनेक वर्ष कामाला होते.त्यामुळे त्यांचा सावळीविहीर रुई कोहकी व परिसरात मोठा संपर्क होता .त्यांच्या या अशा निधनाच्या वृत्तामुळे सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ,दुःख व्यक्त होत आहे.या घटनेची शिर्डी पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस  करत आहेत.
close