संगमनेर - बऱ्याच वेळा सामाजिक समस्या मांडणाऱ्या व्यक्तीच्या समस्यांकडे दुर्लक्ष होते.
व्यंगचित्रकार हाही सातत्याने सामाजिक प्रश्नावर भाष्य करीत असतो , हा त्याची भाषा वेगळी असते . रेषा ही त्याची भाषा असते. त्यालाही व्यंगचित्र काढताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो . तुटपुंजे मानधन , तेही वेळेवर न मिळणे , व्यवसायातील , सामाजिक असुरक्षितता , संपादक , प्रकाशक यांच्याकडून मिळणारा वेगवेगळा प्रतिसाद . असे अनेक पैलू या " मी व्यंगचित्रकार " या विषयाला घेऊन वेगळा आणि थोडा आव्हानात्मक विषय घेऊन दोन भागाचे इ -बुक नुकतेच प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रातील निवडक ५६ व्यंगचित्रकारांचा समावेश असलेल्या या ई -बुक मध्ये संगमनेरचे व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांच्या दोन व्यंगचित्रांचा समावेश आहे.
व्यंगचित्रांच्या माध्यमातून लॉक डाऊन काळात कोरोना विषयक जनजागृती करणारी व्यंगचित्रे काढली आहेत त्यालाही महाराष्ट्रभर सोशल मीडिया आणि दैनिकांनी प्रसिद्दी दिली आहे. वाचकांनी पसंती दिली आहे. अरविंद गाडेकर यांनी या ई -बुकमध्ये व्यंगचित्रकार होण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी येणाऱ्या अडचणी व्यंगचित्रातून दर्शविल्या आहेत. व्यंगचित्रकाराच्या जीवनात व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारिता जपण्यासाठी व्यंगचित्रकार कसे झटत आहे याचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर , प्रशांत कुलकर्णी , संजय मिस्त्री , विवेक मेहेत्रे , खलील खान , ज्ञानेश सोनार , चारुहास पंडित , बाबू गंजेवार , गणेश काटकर , प्रभू केळुस्कर ,राधा गावडे यासह अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे या ई -बुक मध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक व्यंगचित्रकाराने व्यक्त होण्यासाठी आपली कुंचल्यातून भावना व्यक्त केल्या आहेत. लॉक डाऊन काळात प्रसिद्ध होणारे हे दुसरे ई -बुक असून अतिशय सुबक मांडणी आणि मार्मिक रेषांनी , मार्मिक पंच व्यंगचित्रात दिसून येतो .