shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे सैनिक अॅकेडमीचे सामाजिक उपक्रम..!!

देहरे सैनिक अॅकेडमीचे सामाजिक उपक्रम..
 अहमदनगर- देहरे येथील देहरे सैनिक Acedemy च्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात.गरजू-गरिबांना अन्नदान,वृध्दांना मदत,वृक्षारोपन,गरिब विद्यार्थ्यांना सैनिकी मोफत प्रशिक्षण,वृक्षसंवर्धन,नारी सन्मान अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवून देहरे सैनिक अॅकॅडमी सामाजिक बांधिलकी जपत आहे.

    त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात दिनांक 13 जून रोजी सामाजिक अंतर पाळत सामाजिक उपक्रमात हातभार लावण्यात आला..जिल्हा प्रथमिक शाळेत लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना लागणारी शैक्षणिक पुस्तके विद्यालयात आली होती, 

त्यावेळी देहरे येथील सैनिकी अॅकॅडमीच्या वतीने ती आलेली सर्व पुस्तके उचलून सुरक्षित ठिकाणी व्यवस्थित  ठेवण्यास हातभार लावला. अशा प्रकारे देहरे येथील सैनिक अॅकॅडमी वर्षभर सामाजिक उपक्रमात भाग घेण्यासाठी नेहमी अग्रेसर असते.या त्यांच्या चांगल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे...!!
close