हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१४,सध्या देशभरासह महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून कोरोना बाधितांना आर्थिक मदत म्हणून हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार आज दि. १४ जुन रोजी सेनगांवचे तहसिलदार जीवककुमार कांबळे यांच्याकडे जमा केला आहे.
यावेळी बाजार समितीचे प्रशासक योगेश आरसोड, सेनगांवचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, बाजार समितीचे सचिव दत्तात्रय वाघ व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सचिव वाघ व कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक असणारे अन्नधान्य खरेदी विक्रीचे व्यवहार चालु ठेऊन शेतकरी वर्गाला न्याय देऊन शेतकरी वर्गाची सेवा करुन लाँँकडाऊन काळात अविरत काम केल्यामुळे शेतकर्यांच्या अडचणी सोडविल्या असे उदगार तहसिलदार कांबळे यांनी काढले. तसेच मुख्याधिकारी फडसे यांनी देखील बाजार समितीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

