shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आंबेडकर विचारधारा पेरणी करणारा प्रसिद्ध साहित्यिक के.ओ.गिर्हे यांचे निधन..!!

आंबेडकर विचारधारा पेरणी करणारा प्रसिद्ध साहित्यिक के.ओ.गिर्हे यांचे निधन..!!

औरंगाबाद:    भटक्याकार के.ओ.गिर्हे भटक्या विमुक्तांच्या वेदना वेशीवर टांगणार सच्चा कार्यकर्ता होता. ते भटक्यामधील थोर साहित्यिक होते त्यांचे भटके आत्मकथन, गोपाल समाज इतिहास व संस्कृती , दोरीवरच काळीज,भटक्यांची स्वातंत्र्याची पहाट कधी उजाडेल, मजल दरमजल असे पाच पुस्तके प्रकाशित असून भटक्यांचे मुखपृष्ठ असलेले  भटक्यांचे भावविश्व या मासिकाचे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांनी अखिल भारतीय भटके आदिवासी साहित्य संमेलन २००८ मध्ये अध्यक्षपद भूषविले होते. आणि सध्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त संघर्ष समिती चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. के.ओ.गिर्हे म्हणजे सतत धडपडणारे मितभाषीय व्यक्तिमत्त्व , भटक्यांच्या प्रश्नांना वेशीवर टागण्याचे कार्य या मासिकाच्या माध्यमातून करत असत. त्यांच्या जाण्याने भटक्यांचे साहित्यविश्व लुळेपांगळे झाले. आंबेडकरी साहित्य विश्वात मोठी हानी व पोकळी निर्माण झाली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- जेष्ठ साहित्यीक टी एस चव्हाण, कवी एकनाथ खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते दुर्गादास गुढे, अंबादास रगडे, देठे , पंडित तुपे, प्राचार्य हसन इमानदार, प्रा.ग.ह.राठोड, कवी किसन पवार, प्रा.शिवाजी वाठोरे, भारत ससाणे, प्रा.सुधीर आणवले, कोंडीबा हटकर , कवी नातू पोगे, भीमराव मोटे, प्रा.प्रकाश वाघमारे, सर्जेराव मुसळे,प्रा.नवनाथ गोरे यांनी कै. भटक्याकार के.ओ.गिर्हे यांना श्रद्धांजली अर्पण केले.
close