हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२६,हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भगवती हे गाव वाशिम हिंगोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असल्यामुळे प्रशासनाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे स्वप्न आहे की आपल्या भारत देशाला डिजिटल देश बनवण्याचे सेनगाव तालुक्यातील भगवती या ठिकाणी डिजिटल तर सोडा चक्क गुडघ्या इतका चिखल तुडवत शेतकऱ्यास पायपीट करावी लागत आहे.
वयोवृद्ध शेतकऱ्यांना सुद्धा अशा रस्त्यांमधून ये जा करावी लागत आहे प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज देऊन कुठल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही मागील वर्षी एक वेळ मंडळ अधिकारी येऊन पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला होता परंतु तो सुद्धा संबंधित शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केला आहे भगवती येथील गावकऱ्यांचा हक्काचा पांदण रस्ता ज्याची रुंदी ३३फूट असून हा रस्ता प्रत्यक्षामध्ये दहा फूट सुद्धा नाही त्यामुळे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याचा ते तीस फूट त्यांचा हक्काचा रस्ता त्यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी भगवती येथील शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा आम्ही तहसील सेनगाव तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन किंवा उपोषण करू असा इशारा दिला आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याचा रस्ता तात्काळ खुला करून द्यावा अशी मागणी नागरीकातुन होत आहे.