पिंपरी-चिंचवड (पुणे):- भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र कामगार महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. राजश्री काकासाहेब जायभाय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक विठ्ठलराव वणवे पाटील यांच्या स्वाक्षरीने याबाबतचे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
राजश्री जायभाय या पिंपरी चिंचवड शहर भाजपातील जुन्या निष्ठावंत म्हणून ओळखल्या जातात. गेली अनेक वर्षे संघटीत असंघटित कामगार क्षेत्रात सक्रियपणे त्या कार्यरत आहेत. त्यांचे कार्य पाहून कामगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष अशोक विठ्ठलराव वणवे पाटील यांनी जायभाय यांची पश्चिम महाराष्ट्र कामगार महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्या नियुक्ती पत्रकात म्हटले आहे की, कामगार चळवळ सक्षम व सक्षक्त करण्याच्या हेतुने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष संजय केनेकर यांना अभिप्रेत असणारी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीची ध्येय, धोरणे कामागारांच्या समस्या व संघयनेने दिलेले कार्यक्रम कामगारांच्या शाश्वत विकासासाठी राबवुन देशाच्या सर्वागीण प्रगतीमध्ये कामगार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी राजश्री जायभाय यांच्यावर सोपवत आहोत. आगामी काळात कामगार आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडावी. कामगारांच्या विकासासाठी, न्याय हक्कांसाठी बांधील राहावे अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

