shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्ह्यातील "सेतु" कार्यालय सुरु करण्याचे आदेश..!!

जिल्ह्यातील "सेतु" कार्यालय सुरु करण्याचे आदेश..!
मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे यांचे हार्दिक आभार: आप्पासाहेब ढुस 


देवळाली प्रवरा - दि. 02 जुन 2020
महा ई सेवा केंद्र (सेतु) सुरू करणे बाबत देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे विनंतीवरुन अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी यांनी सेतु सुरु करने बाबत च्या नियमोचीत कार्यवाही चे दि. 21 मे चे  आदेश राहुरी तहसिल कार्यालयात दि.30 मे पर्यंत पोहचलेच नाहीत. त्यामूळे जिल्हाधिकार्यांच्या "सेतु" ला दप्तर दिरंगाई ने रोखले बद्दल ढुस यांनी अहमदनगर चे मा. जिल्हाधिकारी यांना व राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. श्री उद्धवजी ठाकरे यांना ई मेल द्वारे 30 मे रोजी  पत्र पाठवुन कळविले व सेतु सुरु करण्याची विनंती केली होती.


त्या विनंतीस मान देवून मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशा नुसार आज अहमदनगर चे जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी काही अटी व शर्ती नुसार सेतु सुरु करण्याची परवानगीचे आदेश दिले.आप्पासाहेब ढुस यांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले होते की, महोदय...,आपल्या मार्गदर्शनाखाली राज्यातील लॉक डाउन हळू हळू शिथील होत आहे. त्यामूळे राज्यातील शाळा महाविद्यालये लवकरच सुरू होतील यात शंका नाही.  
         
जुन 2020 पासून मुलांच्या नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. काही पदवी आणी पद्व्युत्तर अभ्यासक्रमाचे ऑनलाइन अभ्यास व परिक्षेसाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे.मात्र या ऑनलाइन शैक्षणिक प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याकरिता आवश्यक असणारे कागदपत्र मिळण्यासाठी  राज्यातील सर्व महा ई सेवा सेतू कार्यालय बंद असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. 
     
सध्या विविध कोर्सेस च्या प्रवेशासाठी असणाऱ्या जसे की Neet UG, PG, AI AP GET, व इतर काही परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी  विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जसे EWS Certificate, उत्पनाचा दाखला, Caste Certificate ची आवश्यकता आहे. तथापी सेतू कार्यालये बंद असल्याने विध्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. तसेच सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी विविध कागदपत्रांची जुन जुलै मध्ये गरज पडणार आहे व त्याची तरतूद आत्ताच होणे आवश्यक आहे अन्यथा ऐनवेळी सेतु कर्यालयामध्ये मोठी गर्दी उसळून प्रश्न निर्माण होणार आहेत.  
     
करिता राज्यातील महा ई सेवा केंद्र (सेतु) तातडीने सुरू करने बाबत आवश्यक ती उपाययोजना करणे कामी संबंधित विभागाला योग्य ते आदेश द्यावेत अशी विनंती केली होती.सदर विनंतीस मान देऊन अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा. राहुल द्विवेदी यांनी मा. उप जिल्हाधिकारी, महसूल विभाग यांना नियमोचित कार्यवाहीसाठी पत्र क्र 1533/2020 दि. 21/05/2020 अन्वये कळविले आहे. 
     
तथापी आज दि. 30/05/2020 पावेतो राहुरी तालुक्यातील सेतु कार्यालये सुरु झालेले नाहीत. तसेच त्याबद्दल राहुरी च्या तहसिल कार्यालयाला अद्याप  कोणत्याही सुचना प्राप्त झाल्या नाहीत असे समजते. ई.मेल च्या जमान्यात अहमदनगर येथून राहुरीला आदेश येण्यासाठी आठ दिवस लागतात त्यामूळे येथील विद्यार्थी, पालक व नागरिकांमधे संताप व्यक्त केला जात आहे. तसेच  अहमदनगर च्या जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाला दप्तर दिरंगाईने रोखले असल्याच्या चर्चेने जनतेच्या सहनसीलतेचा सेतु कोसळू शकतो व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राहुरी तहसिल समोर सेतु कार्यालये सुरु करण्यासाठी विद्यार्थी व पालक यांचे मोठे आंदोलन उभे राहू शकते व त्यामूळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो याची कृपया नोंद घ्यावी. 
     
सबब आपणास विनंती की, राहुरी तालुक्यातील सेतु कार्यालये सुरु करण्या बाबद संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत अशी  दुबार विनंती ढुस यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा ना श्री उद्धवजी ठाकरे यांना केली. त्या विनंतीस मान देवून मंत्रालयातुन जारी झालेल्या आदेश्या नुसार अहमदनगर चे जिल्हाधिकारी मा राहुल द्विवेदी  यांनी आज लेखी आदेश काढुन काही अटी व शर्ती लाऊन सेतु सुरु करण्यास परवानगी दिली. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री उद्धवजी ठाकरे  व अहमदनगर चे जिल्हाधिकार राहुल द्विवेदी यांचे  आप्पासाहेब ढुस यांनीआभार  व्यक्त केला आहे.
close