वडार समाजासाठी तालुक्यात वडार भवन उभारण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडे मागणी..!!
अहमदनगर :- वडार समाजासाठी वाचनालय उपलब्ध करून देणे, सभा मंडप व वडारभवन बांधुन देणे बाबत चे निवेदन कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब लष्करे यांनी कर्जत- जामखेड चे आमदार मा.रोहितदादा पवार यांचेकडे मागणी केली आहे.
अनेक मुले- मुली शिक्षणासाठी तालुक्यात येतात, यासाठी समाजातील लोकांना याचा फायदा होईल तसेच परिस्थितीने गरीब असलेल्या मुलां - मुलींना मोफत हॉल उपलब्ध करून देता येईल यासाठी सदर निवेदन देण्यात आले आहे.निवेदन देतेवेळी बापूसाहेब लष्कर , राजू लष्कर , राहुल पवार बाळू भांडवल कर , काशिनाथ जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

