shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी चिंचवडकरांनी दर गुरूवारी आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे; महापौर माई ढोरे यांचे आवाहन..!!

पिंपरी चिंचवडकरांनी दर गुरूवारी आणि रविवारी स्वयंस्फूर्तीने ‘जनता कर्फ्यू’चे पालन करावे; महापौर माई ढोरे यांचे आवाहन..!!

July 08, 2020In: पिंपरी-चिंचवड(पुणे) :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनो विषाणूचा वाढता संसर्ग, त्याने आलेले हे अभूतपूर्व संकट पाहता ही कोरोना विषाणू प्रसाराची साखळी तोडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत स्वत:हून ‘जनता कर्फ्यू’ पाळावे. कोणीही अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

गेल्या चार महिन्यापासून महापालिकेतील व शहरातील  डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातले कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महापालिका  प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था कोरोना विरोधात लढा देवुन कोरोना हद्दपार करणेसाठी कसोशीने प्रयत्न करत आहेतच. पण हा लढा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोरोना प्रसाराचे संपूर्ण जनतेपुढे आलेले हे  गंभीर संकट दुर करण्यासाठी व त्याला आळा घालणेसाठी शहरातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी या जनता कर्फ्युमध्ये स्वत:हुन सहभाग घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील सर्व कारखानदार, खाजगी अस्थापना, घाऊक व किरकोळ मालाचे व्यापारी, दुकानदार, भाजी विक्रेते, भाजी मंडई चालक, मटण मांस विक्रेते यांना आवाहन करणेत येते की खरेदीसाठी होणारी गर्दी टाळणेसाठी आपण दर गुरुवारी व रविवारी आपली दुकाने, अस्थापना जनता कर्फ्युचा उद्देश साध्य करण्यासाठी पूर्णवेळ बंद ठेवुन महापालिकेस सहकार्य करावे. तसेच शहरातील नागरिकांनी दर गुरुवारी व रविवारी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच ते करावे अन्यथा संपूर्ण दिवसभर घरीच रहावे तसेच स्वत:ची काळजी घ्यावी व इतरांचीही घ्यावी, असे तुमच्याकडून मला सहकार्य हवे आहे, असेही महापौर व सत्तारुढ पक्षनेते यांनी शहरातील जनतेला आवाहन केले आहे.
close