shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लॉकडाऊनमध्येही परदेशी तरूणी करत होती देहविक्रीचा व्यवसाय; वाकड पोलीसांनी केला पर्दाफाश..!!

लॉकडाऊनमध्येही परदेशी तरूणी करत होती देहविक्रीचा व्यवसाय; वाकड पोलीसांनी केला पर्दाफाश..!!

 July 18, 2020 

पिंपरी - राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरात सध्या लॉकडाऊन सुरू असून परदेशी महिला आणि तरुणी व्हॉटसअ‍ॅपव्दारे देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड पोलिसांनी याचा पर्दाफाश केला असून संबंधितांना ताब्यात घेतले आहे.

वाकड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ युगांडा येथे राहणारी २५ वर्षीय तरुणी आणि ४० महिला या पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या महामारीच्या काळात देहविक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांनी एका व्हॉटसअ‍ॅप नंबरवरून हा व्यवसाय चालू ठेवला होता. भाड्याच्या घरात ग्राहकांना बोलावून देहविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे करत होत्या. त्यांच्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती होती. दरम्यान, या घटनेची माहिती वाकड पोलिसांना मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन महिला आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले. उपजीविका भागविण्यासाठी त्या देहविक्री करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त शहरात आणखी मोठे परदेशी रॅकेट आहे का? याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

याप्रकरणी २५ वर्षीय तरुणी आणि ४० वर्षीय महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात राहण्यासाठी लागणाऱ्या व्हिसाची मुदत संपली असता बेकायदेशीररित्या राहात असल्याचे देखील पोलीस तपास समोर आले आहे. या घटनेप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सपना देवतळे यांनी फिर्याद दिली आहे.
close