सावळीविहीर(राजकुमारगडकरी):
महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील हॉटेल ,लॉज ,गेस्टहाऊस बंद ठेवण्यात आले होते, परंतु आता काही अटी व शर्ती ठेवून ते सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी शिर्डीत मात्र हॉटेल, लॉज,गेस्टहाऊस सुरू होण्याची शक्यता कमी दिसत आहे ,शिर्डीतील हॉटेल ,लॉज, व्यवसायिकांची हॉटेल ,गेस्ट हाऊस जाचक अटींमुळे व श्री साईबाबांचे मंदिर दर्शनासाठी भाविकांना बंद असल्यामुळे सुरु करुन फारसा फायदा होणार नसल्याने ते बंद ठेवणे योग्य राहील.असे शिर्डीतील व्यावसायिकांकडून बोलले जात आहे.
राज्यात जरी हॉटेल, लॉज, गेस्टहाऊस निवासासाठीकाही अटी व शर्ती ठेवून सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली असली तरी शिर्डीत मात्र अशी परवानगी असतानाही शिर्डीतील हॉटेल ,लॉज गेस्ट हाऊस व्यावसायिक आपले हॉटेल, लॉज, गेस्टहाउस सुरू करण्यास तयार नाहीत.कारण शिर्डीत श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी 17 मार्च 2020 दुपारी 3 वाजेपासून कोरोणाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बंद करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे जिल्हा बंदी असल्याने येथे साईभक्त ही दर्शनासाठी येत नाहीत. शिर्डीत सर्वकाही श्री साईबाबांच्यामंदिरावरच अवलंबून आहे. शिर्डीत येणाऱ्या रेल्वेही बंद आहेत, शिर्डीत श्री साईबाबांचे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद असल्यामुळे व साईभक्त येणे बंद असल्यामुळे येथे हार प्रसादाची, दुकाने, ट्रॅव्हल्सकार्यालये ,खाजगी बसेस, खासगी प्रवासी वाहने, फुल मार्केट, त्याप्रमाणे हॉटेल,लॉज, गेस्ट हाऊस ,रेस्टॉरंट सर्व काही बंद आहे. श्री साईबाबा संस्थानचेही प्रसादालय निवासस्थाने बंद आहेत. शासनाने हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस निवासासाठी सुरू करण्याची अटी व शर्ती ठेवून परवानगी दिली असली तरी शिर्डीत मात्र साईभक्त येत नसल्यामुळे हॉटेल रोज सुरू ठेवून करणार काय? असा सवाल हॉटेल व्यवसायीक करत आहेत. शिवाय हॉटेल, लॉज सुरू केले तरी फक्त ३३ टक्के जागाच हॉटेलात भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे येथे हे शक्य होणार नाही. कारण शिर्डीत सुमारे एक हजारच्यावर छोटी-मोठी हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस आहेत. शिवाय साईसंस्थानचे भक्तनिवास आहेत. येथे संपूर्ण निवास व्यवस्था साईभक्तांची धरली तरी संपूर्ण निवास स्थानांमध्ये 50000 साईभक्त दररोज राहू शकतात. एवढी मोठी येथे निवास व्यवस्था खाजगी व संस्थांनची आहे. शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर अटी व शर्ती ठेवून दर्शनासाठी टाईम स्लॉट पाडून भक्तांना दर्शनासाठी काही दिवसांनी का होईना सुरू झाले तरी दिवसभरात दोन ते तीन हजार भाविक दर्शन करू शकतात. त्यांना तारीख व वेळ दिलेली असल्यामुळे भाविक आपल्या गावावरून वेळेत येथे येऊन ,वेळेत दर्शन करून परत जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हॉटेल ,लॉजमध्ये मुक्काम करण्यास साईभक्त अधिक येथे थांबणार नाहीत. जरी थांबले तरी साईसंस्थांनच्या भक्त निवासस्थाने आहेत. शासनाने प्रत्येक हॉटेल ,लॉज, गेस्ट हाऊसला ते 33 टक्के जागा फक्त भरण्याचीअट घातली असल्यामुळे १००रूम पैकी ३३ रूम भरल्या गेल्या व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा वापरली तर कर्मचारी व हा खर्च हॉटेल मालकाला परवडत नाही. त्यामुळे हॉटेल लॉज ,गेस्टहाउस सुरू करण्यास शिर्डीतील हॉटेल व्यावसायिक मात्र तयार नाहीत. असे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आता चर्चा होत आहे.

