shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रत्येक झोनसाठी नोडल ऑफिसर म्हणून स्वतंत्र सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती..कोणताही गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नाही, प्रत्येक खर्चाचे ऑडिट केल्याशिवाय देयक अदा न करण्याचे आदेश..!!

लातूर ।शहर  प्रतिनिधी :  (रवि बिजलवाड )
कंटेनमेंट झोन मधील उपाययोजनांसाठी संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे...

कोरोना टास्कफोर्सची आढावा बैठकीत निर्देश..
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या कोरोना टास्कफोर्सची आज आढावा बैठक घेतली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शहरातील प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर म्हणून सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्याचा व संबंधित झोन पुरते सर्व अधिकार त्या त्या नोडल ऑफिसर ला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 
झोन अ करिता श्रीमती शैलजा डाके, झोन ब करिता श्रीमती मंजुषा गुरमे, झोन क करिता श्रीमती वसुधा फड, झोन ड श्री सुंदर बोंदर यांना कार्यभार सोपविण्यात आला आहे.

कोरोना काळात केल्या जाणाऱ्या  प्रत्येक खर्चाचे ऑडिट केल्याशिवाय देयक अदा करू नये. असे आदेशित करण्यात आले. कंटेनमेंट झोन मधील कमतरता बाबत काही मनपा सदस्य यांनी दूरध्वनी करून नाराजी व्यक्त केली असता याबाबत संबंधितांची चौकशी करून दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या.
कंटेनमेंट झोन मधील उपाययोजनांसाठी संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे सहकार्य घ्यावे अशा सुचनाही संबंधितांना दिल्या.

या आढावा बैठकीला उपमहापौर चंद्रकांतजी बिराजदारआयुक्त देविदासजी टेकाळे, उपायुक्त शशीमोहनजी नंदा,‌ सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
close