shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समाजापुढे अनोखा आदर्श..!! तिनशे झाडांचे वृक्षारोपन करुन घातला वाढदिवस - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले कौतुक..!!

समाजापुढे अनोखा आदर्श..!!
       
तिनशे झाडांचे वृक्षारोपन करुन घातला वाढदिवस - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले कौतुक..!!

इंदापूर।प्रतिनिधी :
(तात्याराम पवार)

 बाभुळगांव(तालुका इंदापूर) येथे  आज दिनांक २७/०७/२०२० रोजी अनोखा वाढदीवस साजरा करण्यात आला. कोरोना चे संकट असताना कोणत्याही प्रकारचा अतिरेक न करता बाभुळगांव मधील स्नेहा अमोल इंगळे हीच्या नवव्या वाढदिवसानिमित्त इंगळे परिवाराने तिनशे वृक्ष लागवडीचा संकल्प करत समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. व बाभूळगांच्या माळावरचं केक कापून अनोखे सेलिब्रेशन सुध्दा करण्यात आले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले,की अमोल इंगळे सारखा एक युवक नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतो.अमोल हा तरूण पिढी चे नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहे याचा आम्हाला आनंद आहे.अमोल चा सामाजिक उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवून समाज उपयोगी कार्य करण्यावर त्याचा नेहमीच भर असतो. त्याने अल्प काळात चांगले युवकांचे संघटन देखील निर्माण केले अाहे. आजच्या उपक्रमाबद्दल ही त्याचा मला अभिमान वाटतो.
सध्या कोरोना वायरस चे थैमान असून याकडे गांभीर्याने पाहीले पाहीजे. जनतेने प्रशासनाला सहकार्य करून आपली काळजी घ्यावी सोशल डिस्टंसिंग ठेवावे .तोंडाला मास्क लावणे व वेळोवेळी आपले हात स्वच्छ करावे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या रुतुजा पाटील,जेष्ट नेते कल्याण गुरगुडे, संचालक भास्कर गुरुगुडे,सरपंच भारत यादव,सरपंच रविंद्र पाटील, तालुकाध्यक्ष राम आसबे, प्रितम देवकर, पै.बबलू पठाण,विजय देवकर, सोमनाथ जावळे, पोपट भोसले, नागनाथ गुरगुडे, डाॅ.दत्तात्रय भोसले,शिवाजी जगताप, अतुल सरडे, रामभाऊ जमदाडे, वनरक्षक एस.व्ही.गिते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाजी जगताप, भगवान मोरे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन महेश इंगळे यांनी केले तर आभार राजेंद्र इंगळे यांनी मानले.
close