shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंबरनाथ शहरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त "वृक्षारोपण व अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप..!!

अंबरनाथ शहरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसानिमित्त "वृक्षारोपण व अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटप..!!

अंबरनाथ (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीने "वृक्षारोपण व अनाथ आश्रमात शालेय साहित्य वाटपा" चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील ह्यांच्यावतीने राबविण्यात आले होते.

अंबरनाथ शहर पूर्वेकडील वॉर्ड क्रं. 57 येथील जांभिवली गांव/पाडा या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आनंदनगर येथील अनुग्रह आश्रम शाळेतील अनाथ विद्यार्थ्यांना प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ ह्यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायजर, शालेय साहित्य आदींचे वस्तुंचे वाटप करून येथील शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आली. 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, प्रदेश सरचिटणीस सुभाष पिसाळ, माजी नगरसेविका वृषाली पाटील, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, सोशल मीडिया सेल तालुका विधानसभा अध्यक्ष मिलिंद मोरे, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष पुष्पराज गायकवाड, युवक विधानसभा अध्यक्ष सचिन अहिरकर, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे, भगवान महाजन, विकास राजपूत, नामदेवराव गुंडाळे, ओबीसी सेल अध्यक्ष हेमंत जाधव, कृष्णा वामसी ह्यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
close