अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांना विधान परिषदेवर घेण्याच्या कलाकाराच्या मागणीसाठी सर्वसामान्य कलाकाराचे समर्थन..!!
मुंबई । विशेष प्रतिनिधी :
खरंतर कुणावरही टीका करणे अगदी सोप्प आहे, आणि एखादया व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर टीका केली की त्याला समर्थन करणारे ही तेवढेच असतात आणि विरोध करणारे ही तेवढेच असतात. हीच तर खऱ्या अर्थानं लोकशाही ची कमाल आहे, किंवा हीच लोकशाही ची देण आहे असं म्हणायला हरकत नाही, इथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार नक्कीच आहे.
दिग्दर्शक : रमेशजी पवार
म्हणून प्रत्येक जण आप आपली मतं मांडत असतात.
आपण बरेच जण वेगवेगळ्या ग्रुप वर असतो, आहोत ही मध्यंतरी असंच आपल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज राजे भोसले सर यांना उद्देशून एक पोस्ट फिरत होती, ज्यामध्ये आम्ही विधानपरिषदेवर तुमची नयुक्ती करण्यासाठी समर्थन करु, पण महामंडळ कलाकारांसाठी काय-काय करत हे स्पष्टीकरण द्याव. असं त्या आदरणीय लेखक किंवा कलाकाराचं मत होतं.
एखाद्या क्षेत्रात काम करत असताना किंवा कुठल्याही संघटना असो किंवा क्षेत्र असो तिथे सर्वच गोष्टी असतात म्हणजे सकारात्मक गोष्टी ही असतात आणि नकारात्मक गोष्टी ही असतात. पण दुर्दैवाने बहुतेक लोकांचं नकारात्मक गोष्टी कडे लवकर लक्ष केंद्रित होतं,
उदा: जर एखाद्या व्यक्तीने 1 लाख रुपयांचा छानसा सूट घातला आणि दुर्दैवाने त्या सूट ला चुकून छोटासा ही डाग लागला तर प्रत्येक जनाचं आधी त्या डागा कडे लक्ष जाणार, त्या बद्दल ते विचारणा करणार की हा डाग कसा लागला, आनि त्याच ऊत्तर मिळालं की त्या डागा बदल चर्चा संपवणार आनि सूट कडे लक्ष केंद्रित करून त्या बद्दल चर्चा करणार , पण दुर्दैवाने काही जण मात्र त्या सूट कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून त्या छोट्याश्या डागा बद्दल कायम चर्चा करत राहणार.म्हणून त्या डागा बद्दल जर कुणी चर्चा करत असेल तर तो सूट घालणाऱ्याचा नाही तर चर्चा करणार्यांचा आणि त्याला समर्थन करणाऱ्या मंडळींच्या नकारात्मक दृष्टीकोणाचा भाग आहे..
खरंतर आपण सर्वजण अत्याधुनिक इंटरनेट च्या एकविसाव्या शतकात वावरत असतांना एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीला वयक्तिक भेटलंच पाहिजे असं काही नाही.
असेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज राजे भोसले सर यांचं कार्य आहे म्हणूनच अत्यंत ग्रामीण भागातील छोटासा कलाकार असो, किंवा पुणे-मुंबईतील एखादा जेष्ठ कलावंत असो, प्रत्येकाला आदरणीय मेघराज सर हे भावा प्रमाणे वाटू लागतात, आणि म्हणून हक्काने प्रेमाने सर्वजण त्यांना °मेघराज भैया" म्हणून संबोधतात..
काल परवाच एक किसा आहे, एका व्हाट्सएप ग्रुप वर कुण्यातरी एका व्यक्ती ने दुसऱ्या एका ग्रामीण भागातील कलाकाराचं नाव घेऊन तिसऱ्या व्यक्तीशी काहीतरी बोलणं केलं जे की करायला नको होतं..
नंतर त्या अत्यंत ग्रामीण भागातील कलाकारांने स्पष्ट केलं की कुणीतरी माझ्या नावाचा गैर वापर केला आहे मी कुण्याही कलाकारांसोबत कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही.. कुणालाही माझ्या बद्दल काही शंका असेल तर मला कॉल करावा मी मेघराज भैया ना सुद्धा कॉन्फरन्स वर घेतो.. आणि मग आपण सोक्षमोक्ष करू...
हे सर्व सांगण्या मागचा उद्देश फक्त हा की अत्यंत ग्रामीण भागातील छोट्यातल्या छोट्या कलाकाराला ही खात्री आहे की मी थेट मेघराज भैया शी बोलू शकतो, आणि ते ही माझा कॉल उचलतील..आजच्या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या होणाऱ्या so called आदरणीय दिग्गज कलाकारांच्या गर्दीत, म्हणजे एखाद्या चित्रपटात किंवा सिरीयल च्या एखाद्या Episod मध्ये 3 मिनिटांचा किंवा 5 मिनिटांचा रोल केला असेल आणि दुसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीने त्या कलाकाराला काम देण्यासाठी कॉल केला तर माझ्या असिस्टंट किंवा मॅनेजर शी बोलून घ्या म्हणाऱ्यांची वर्दळ असतांना सुद्धा थेट अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माझ्या अध्यक्षांशी मी बोलू शकतो.. हाच खूप मोठा विश्वास आहे, आणि हे चांगलं कार्य केल्याशिवाय कलाकारांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. म्हणून जर ग्रामीण भागातून सुद्धा कलाकाराच्या आदरणीय मेघराज राजे भोसले सरांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी होत असेल तर त्यात गैर काय आहे?
खूप वेळा महाराष्ट्र राज्यातील छोट्या छोट्या ग्रामीण भागातील तरुण कलाकारांच्या मनात असलेले,
जर नवोदित कलाकारांना एखादा व्यक्ती आपला हक्काचा माणूस वाटत असेल तर त्यात त्याच काय चुकलं? म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा पुणे नाट्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय मेघराज राजे भोसले सर यांची सांस्कृतिक व कलाक्षेत्रातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाली पाहिजे या साठी एक सामान्य कलाकार म्हणून माझे 100% समर्थन आहेच..
रमेश पवार- ९९३०४४१३१२
( संस्थापक अध्यक्ष कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबई)

