राजगुरुनगर । प्रतिनिधी :- ( विद्याधर साळवे )
खेड तालुक्यात बेकायदेशीर अवैध गौण खनिज उत्खननास मनाई करणाऱ्या महिला तलाठी व कोतवालाला दमदाटी, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चार जणांवर राजगुरुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजगुरुनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील खरपुडी ( मांडवळा ) येथील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या गट क्रमांक 424 या जमिनीमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे पोकलँड द्वारे उत्खनन सुरू होते. या अवैध उत्खननाची माहिती येथील महिला तलाठी स्वाती चंद्रकांत तावरे यांना मिळाली. बेकायदेशीरपणे विनापरवाना सुरु असलेली गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी तलाठी स्वाती तावरे व कोतवाल दत्तात्रय छबु चव्हाण हे घटनास्थळी गेले व त्यांनी उत्खननास मनाई केली. यावेळी महेंद्र काळूराम भोगाडे, श्रीधर दगडू चौधरी , प्रवीण श्रीधर चौधरी, प्रसाद जालिंदर चौधरी हे ( सर्व राहणार खरपुडी बुद्रुक तालुका खेड) बेकायदेशीरपणे जमाव जमवून विनापरवाना गौण खनिजाची चोरी करत असता पोकलँड मशीन बंद करण्यास सांगितली त्यावेळी कोतवाल दत्तात्रय चव्हाण यांना ढकलून देऊन महिला तलाठी स्वाती तावरे यांना शिवीगाळ दमदाटी करून पंचनामा करत असताना सरकारी कामकाजात अडथळा आणला. तसेच उत्खननासाठी वापरण्यात आलेले पोकलेन मशीन व इतर वाहने जप्त न करू देता दमदाटी करून तिथून घेऊन गेले.
याबाबत तलाठी तावरे यांनी सदर जागेचा पंचनामा करून संबंधित जागेवरून माती, मुरूम व दगड अशा गौण खनिजाचे उत्खनन झाले असल्याचा अहवाल खेड तहसीलदार सुचित्रा आमले यांना सादर केला आहे. याबाबत सरकारी कामात अडथळा आणून महिला तलाठी व कोतवालास शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख करत आहेत.