shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव शहरात व्यापारी व जनतेकडुन स्वंयस्फुर्तीने तीन दिवस जनता कर्फ्यूस सुरूवात

हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरात कोरोनाने शिरकाव केला असून सध्या ८ कोरोना बांधीत रुग्णांची संख्या असुन एका कोरोना बाधीत ५८ वर्षीय कापड विक्रेताचे निधन झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दि.२२ जुलै बुधवार व दि.२४ जुलै शुक्रवार या तीन दिवसाचा स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन व्यापारी व नागरीकांना केले होते.आज दि.२२ जुलै बुधवार तीन दिवसाच्या जनता कर्फ्यूला व्यापारी व नागरीकांनी समर्थन दिले असून आज पहिल्याच दिवशी दि.२२ जुलै बुधवार रोजी सकाळपासून सेनगांव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

देशासह महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून आता तर सेनगांव शहरात कोरोनाने शिरकाव केला असून सध्या शहरात ९ कोरोना बाधीत रुग्ण असुन यातील एका कोरोना बाधीत ५८ वर्षीय कापड विक्रेताचे निधन झाले असून सेनगांव शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यापा-यांनी व नागरीकांनी तीन दिवसाचा स्वतःहून जनता कर्फ्यू पाळावा असे आवाहन शिवसेना हिंगोली उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केले होते.देशमुख यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी बांधवानी आपली दुकाने सकाळ पासूनच स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले होते. तर नागरीक ही आपल्या घरी कुटुंबासह घरातच राहाणे पसंद केले. शहरातील प्रत्येक चौकात सन्नाटा पाहायला मिळाला.यावेळी शहरात पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ठिक- ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
close