shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक स्तुत्य उपक्रम संपन्न..!!

अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक स्तुत्य उपक्रम संपन्न..!!

 खर्डा (प्रतिनिधीं)अनिल धोत्रे:
         महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि सतत समाज कार्य करताना आपण  समाजाचे काहीतरी देणे आहे .असे मोहरी  गावचे सुपुत्र अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष श्री रामहरी गोपाळघरे यांच्या पुढाकाराने स्तुत्य असा कार्यक्रम राबविण्यात आले. आमदार श्री रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना एक वेगळेच आनंद मिळत आहे. जामखेड तालुक्यातील विलिनिकरण क्षेत्र असलेले  डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय गृह क्वारंन्टाईन कक्षात असलेल्या नागरीकाना आवश्यक असे साहित्याचे कीट स्वरुपात वाटप करण्यात आले. 

            कोरोना या संकटांत जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प संचालक डॉ रविंद्र आरोळे ,डॉ प्रशांत खंडागळे ,सुनिता घोरपडे,समीर शेख सह सर्व नर्स स्टाफ ,कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले .
            यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे  जामखेड शहर शाखा युवक अध्यक्ष अमोल गिरमे, हनुमान बारगजे ,बाबा येळे, वसीम सय्यद, गणेश बादल स्वप्निल उबाळे ,महादेव बहिर ,गोविंद राऊत, बिलाल शेख सह कार्यकर्ते उपस्थित होते.
close