shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजलगाव धरण ५२.९५ टक्के भरले..!!

माजलगाव धरण ५२.९५ टक्के भरले..!!      
केज । प्रतिनिधी :
( प्रकाश मुंडे)         

मराठवाड्यातील पैठण च्या जायकवाडी येथील नाथसागर धरणाचा दुसरा टप्पा म्हणून बांधलेले सिंधफना,बिंदूसरा, कुंडलीका नदीच्या संगमावरील माजलगाव धरण २७ जुलै सोमवार रोजीच्या सांयकाळी सहा वाजता ५२.९५टक्के भरले आहे. अशी माहिती धरण दक्षता पथकाचे अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना शेख यांनी सांगितले आहे की, धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ४३१.८०मीटर असुन नमूद तारीख व वेळी ४२८.६७ मीटर ची पाणी पातळी आहे, आणि याचा उपयुक्त साठा १६५.२० दलघमी आहे. धरणपाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान झाले नाही तर दोन दिवसा पुर्वी झालेल्या पर्जन्यमानाची आवक जास्त प्रमाणात होता पण आता ७३५ क्यसेकने येत आहे.
close