shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना बधितांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा देऊन संत रविदास समाज संघटनेने दाखवले माणुसकीचे दर्शन..!!

कोरोना बधितांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा देऊन संत रविदास समाज संघटनेने दाखवले माणुसकीचे दर्शन


कोरोना बधितांचा अंत्यविधी या पुढे संत रविदास स्मशानभूमीतच होणार- मुख्याधिकारी डॉ.जगताप

 केज  ।  प्रतिनिधी  :
 ( प्रकाश मुंडे)   

    अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दोघांचा कोरोनाचे उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या अंत्यविधिहून शहरात बरच रामायण घडलं, एक नव्हे तर चार ठिकाणच्या नागरिकांनी त्या कोरोना बधितांवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शवल्या मुळे टीव्ही चॅनल च्या माध्यमातून अंबाजोगाई ची मान संपूर्ण राज्यात शरमेने खाली गेली. मात्र माणुसकीचे दर्शन घडवत आता शहरातील संत रविदास सामाजिक संघटनेने या पुढें कोरोना बधितांचा अंत्यविधी करण्यासाठी शहरातील दासोपंत मंदिरा नजीक रेणुका देवी रोड वर असलेल्या श्री संत रविदास मोची समाज स्मशानभूमीत करण्याची लेखी संमती नगर परिषदेला दिली असून कोरोना बधितांचा अंत्यविधी या पुढे संत रविदास स्मशानभूमीतच होणार असल्याचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप यांनी जाहीर केले आहे.

      अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात अंबाजोगाईतील एक आणि सिरसाळातील एक अशा दोघांचा कोरोनाचे उपचार घेत असताना दुर्देवी मृत्यू झाल्या नंतर काहींनी अंत्यविधी या जागेत करायचा नाही यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अगदी चार ठिकाणची जागा बदलली आणि पाचव्या ठिकाणी त्या दोन्ही मृतदेहावर रात्री अंत्यविधी करण्यात आले मात्र ज्या अंबाजोगाईत अशी दुर्दैवी घटना घडली याची चर्चा महाराष्ट्रभर झाली मात्र याच अंबाजोगाईत आता संत रविदास मोची समाज संघटनेने कोरोना बाधित मृतदेहावर अंत्यविधी आमच्या स्मशानभूमीत करा अशी आग्रही मागणी नगर परिषदे कडे केली. न प प्रशासनाकडून त्यांना संमती देखील देण्यात आली असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.यामुळे अंबाजोगाईत माणुसकी जिवंत असल्याचे आजच्या या घटनेवरून समोर आले आहे.यापुढे कोरोना बाधित व्यक्तींवर श्री संत रविदास मोची समाज स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर अंत्यविधी होणार असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ सुधाकर जगताप यांनी सांगितले आहे.

   अंबाजोगाई येथील श्री संत रविदास मोची समाज स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर अंत्यविधी करण्यात यावेत अशी मागणी करून माणुसकीचे आगळे वेगळे दर्शन घडवणारे श्री संत रविदास समाज व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार परदेशी, श्रावण चौधरी, पुनमचंद परदेशी, अनंत परदेशी, सुनील कुरील, मुन्ना परदेशी, पुनमचंद कुरील,आकाश परदेशी,संतोष चौधरी ,भीमसेन अंबेकर, इंद्रसेन परदेशी यांच्या सह सर्व समाज बांधवांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
close