shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुजारी टोला धरण, कोटरा धरणा मध्ये पाणीच नाही..!!

पुजारी टोला धरण, कोटरा धरणा मध्ये पाणीच नाही..!!

गोंदिया । प्रतिनिधी : 
(सचिन श्यामकुंवर)

गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी हजारो शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून रोवणी करण्यासाठी एकदा तरी जोराने बरस देवा म्हणून बळीराजा वरूण राजाकडे साकडे घालत असल्याचे चित्र सध्या येथे दिसतआहे.
        दररोज सकाळ-संध्याकाळी आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होते.बघता-बघता पावसाचे शिंतोडे पडतात व आता पाऊस पडेल अशी आशा पल्लवित होतानाच पाऊस दगा देऊन निघून जातो व उन्ह तापू लागते. त्यामुळे रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहे.
  आज पाऊस नाही आला तर उद्या नक्की पडेल या अपेक्षेने शेतकरी आपल्या घरी येतो.पुन्हा पाऊस आला तर उद्या रोवणी सुरू करायची याचे नियोजन,प्रयोजन करण्याचे स्वप्न रंगू लागतो.पण पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा संकटात सापडल्याचे चित्र पहायला मिळते.
यासाठी शासनाने प्रयत्न करून बळीराजास तारले तर बरे होईल..!!
close