उपेक्षित,दुर्लक्षित असलेल्या वडार समाजाला विधानपरिषदेत सदस्यत्व मिळावे :विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर ..!!
रिसोड : राजर्षी शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून वडार समाज संघाने राज्यपाल आणि मुख्यमंत्रीसह महाआघाडीच्या नेत्यांकडे विधानपरिषदेत दुर्लक्षित असलेल्या वडार समाजास सदस्यत्व मिळावे. यासाठी वडार समाज संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष मा.राकेशजी विटकर याच्या आदेशानुसार विदर्भ अध्यक्ष महादेव कुसलकर यांनी महाआघाडीच्या नेत्यांना तसेच पक्षश्रेष्ठीना,मंत्री महोदयांना संघटनेच्या लेटर पॅडवर निवेदन देऊन महाराष्ट्रातील वडार समाजाला राज्यपाल कोठयातून विधानपरिषदेत सदस्यत्व मिळावे. हि विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात भटक्या विमुक्त जमाती मध्ये धनगर समाज, बंजारा समाजानंतर तिसरे स्थान वडार समाजाचे आहे. महाराष्ट्रात वडार समाज जवळपास 45 ते 50 लाख आहेत.देश स्वातंत्र झाल्यापासून 75 वर्षात फक्त एक वेळ वडार समाजाला हवेली जि.पुणे या मतदार संघातून 1979 ला काॅगेस पक्षा कडून स्व.मोतीराम पवार यांना तिकीट देण्यात आले होते आणि भरघोस मताधिक्याने त्यांची निवड झाली होती. वडार समाजाचे पहिले व्यक्ती विधानसभेवर काॅगेसचे प्रतिनिधित्व करत होते.तेव्हा पासून आज पय॔त वडार समाजाला ना विधानसभा, ना विधानपरिषदेत, ना लोकसभेत, ना राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
या वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित वडार समाजाने काॅगेस पक्षा सोबत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत एका निष्ठेने व प्रामाणिकपणे राहिलेले आहे. तेव्हा या महाआघाडीनी वडार समाजाची विधानपरिषदेत सदस्यत्वासाठी शिफारस करावी.तसेच महामंडळांवर अध्यक्ष व संचालक म्हणून संधी मिळावी.
मा.महादेव कुसळकर सर
वडार समाज अत्यंत कष्टकरी समाज असून आपल्या घामाने दळणवळणाचे रस्ते, सिचंनाची सोय(धरणे, तलाव),प्रशासकीय इमारती, रेल्वेच्या,रस्त्यांच्या बोगद्यांची निर्मिती, शाळा,काॅलेज इत्यादी इमारती या समाजाने बांधून राज्याचा व देशाचा महाविकास घडवून आणला.पण तोच समाज आज विकासापासून कोसोदूर आहे. वडार समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजाला विधानपरिषदेत सदस्यत्व मिळावे. अशी मागणी विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर यांनी केली आहे.
सदर मागणी वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष राकेशजी विटकर,कार्याध्यक्ष भाऊलाल पवार, प्रदेश सरचिटणीस संजय देवकर,माजी प्रदेशाध्यक्ष डाॅ.श्रावन रॅपनवाड,सल्लागार सितारामजी शिंदे,विदर्भ अध्यक्ष महादेव कुसळकर सर,संपर्क प्रमुख अशोक कुलाल सर, जगन्नाथजी फुलारे,चिटणीस लक्ष्मण बामणे, दिलीप गुंजाळ,प.महाराष्ट् अध्यक्ष रामचंद्र मंजुळे,चिटणीस रमेश जेठे सर, उपाध्यक्ष कैलास पवार,बी के गायकवाड,श्रीपाद घोडके,मनोहर विटकर सर, जगन डुकळे ,संपतराव गायकवाड तसेच महाराष्ट्र सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी केली आहे.

