प्रतिनिधी । महेंद्र नवले :
जय जिजाऊ जय आदिवासी जय शिवाई माता
महादेव कोळी चबूतरा किल्ले शिवनेरी हा आदिवासीच्या शौर्याचा , स्वराज्यनिष्ठेचा त्याग , समर्पण पराक्रम कर्तुत्व बलिदानाचा उपेक्षित इतिहास.आजपर्यत विविध साहित्य , पुस्तके शिवनेरी किल्ले इतिहास , ऐतिहासिक कागदपत्रे गाणी यात इतिहास लेखक संशोधक यांनी उल्लेख केलेला आहे.
शिवनेरी किल्ला (जुन्नर )
महादेव कोळी चबूतरा प्रथम उल्लेख सापडला तो
महादेव कोळी चबूतरा प्रथम उल्लेख सापडला तो
¶ Gazzeteers of the Bombay Presidency: Poona District Gazzeteers The moghals army was sent into the bills , the hills forts were strengthened and garrisoned, the people hunted down and either made prisoners or slaughtered the Sarnike and his clan were desroyed, and the prisoners was taken to junnar and their heads cut off and piled into a pyramid and platform builts over them which is still known as Black platform or kala chabutara.( caption mankitosh, jour Bom, Geog, soc I , 241-242.)
Last page वरील नोंद
A group of mahadev kolis managed to rise against the Mughals in-charge and took control of junnar and shivneri.
Earlier this region was under Nijamshahi control. After the fall of Nijamshahi, the border regions were not well governed by either Adilshahi or the Mughals. The mahadev kolis took advantage of this and started controlling the region around junnar. The Mughals took this as a serious offence and sent a huge army to silence this rebellion. Shivneri was beseiged and soon the defending army gave up against stiff opposition. About 1500
¶ इतिहास संशोधक डॉ गोविंद गारे यांनी सह्याद्रितील आदिवासीं महादेव कोळी या पुस्तकात पान नं 65 व 66 व 132 वर महादेव कोळयाचा स्वातंत्रलढ़ा व काळा चौथरा : सामुदायिक कत्तलीची जागाव शिवनेर जुन्नर या प्रकरणात उल्लेख केला आहे.
शिवनेरी किल्ल्यावर मुसलमान राजवटिचे फार काळ वर्चस्व होते राहिले. किल्ला मात्र प्रत्यक्षात महादेव कोळी लोकांच्याच ताब्यात होता. शिवशाहिचा उदय झाल्यावर येथील महादेव कोळी लोकांनी शिवाजी महाराजांना साथ दिली . या कारणा वरुन किल्ल्यावरील त्यांचे वर्चस्व काढून घेण्यात आला. महादेव कोळी लोकांना दहशत असावी म्हणून शिवनेरी किल्ल्यावरच्या पायथ्याशी त्यांची मोठी कत्तल करण्यात आली या कत्तलीत हजारो लोक मारले गेले त्यांच्या मुंडक्यांचा ढिग करुन त्यावर चौथरा ( चबूतरा ) बांधन्यात आला. त्याची कोळी चबूतरा अशी इतिहासात नोंद आहे. हा काळ 1650 चा होता.
महादेवकोळी स्वातंत्र्यप्रेमी बंडखोरांच्या शिरकाणाची आणि सामुदायिक कत्तलीची जागा जालियनवाला बागेतील कत्तली पेक्षाही ही कत्तल भीषण स्वरूपाची होती .
जालियनवाला बागेत इग्रजांनी जे हत्याकांड केले त्यांचे स्मारक आज आम्ही मोठ्या इतमामाने करतो. पहिले राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याचा गौरव करतो. हे सारे हुतांतम्यांच्या बलिदानाची स्मृति करण्यासाठीच , पण शिवशाही उदयाला येत असताना मोगलानी ठिकठिकाणे जी हत्याकांडे केली , त्यांच्या परकीय सत्तेपुढे जी बलिदाने झाली, ती इतिहासात शतकानुशतके गड़प होवून उपेक्षित राहिली आहेत
असे मत डॉ गोविंद गारे यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे.
डॉ गोविंद गारे यांनी मुख्यता खेमा नाईक हा महादेव कोळी सैन्याचा सरनाईक यांचा उल्लेख केला आहे व आदिलशाही सरदार रणदुल्लाखान याचा ही उल्लेख केला आहे.
समकालीन इतिहास अभ्यासला असता असे निदर्शनास येते की रणदुल्लाखांन हा आदिलशाही सरदार शहाजीराजेंचा विश्वासु मित्र होता. 1636 चा माहुलीचा तह मोगल आदिलशाही व शाहाजीराजे घडवून आणण्यामध्ये रणदुल्लाखानाची महत्वाची भूमिका होती.आदिलशाहास शाहजीराजेचे कडील माहुली शिवनेरी चावंड जीवधन हडसर त्रींगलवाड़ी हर्षगड हे किल्ले सोडवून मोगलांकडे खानजमानकडे सुपुर्द करण्याची जबाबदारी होती. निजामशाही राजवटित महादेव कोळी प्रमुखाना बहामनी राजवटीत व अहमदनगरच्या राजवटीत सरदार मनसबदार असे शाहीमरातब मिळत होते. महादेवकोळी लोकांच्या शुरत्वाची व संघटित पणाची चुनुक बादशहाला कळली होती.
( जुन्नर प्रांताची निजामशाहितील जहागीरी मालोजीराजे व शाहाजीराजे यांचेकडे होती.
मालोजीराजे 1591 ते 1595 चाकण शिवनेरी जहागीरी देवून "राजे " हा किताब)
मालोजीराजांच्या निधना नंतर निजामशाहने सर्व जहागिरी शाहाजीराजे व शरीफजीराजे यांना दिली.
डॉ लहू गायकवाड़ - शिवनेरीची जन्मगाथा
क्रमश.!!
गौतम डावखर
जुन्नरचं बारां मावळ
शिवनेर.

