shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते पात्रुड येथे नदीच्या पाण्याचे जलपूजन..!!

 केज तालुका । प्रतिनिधी ( प्रकाश मुंडे) ➤
माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील नदी खोलीकरण करून सिंचन क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या पुढाकाराने पात्रुड येथील नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. नदीचे संपूर्ण खोलीकरणाचे काम झाल्याने व या वर्षी पाऊस चांगला झाल्याने हि नदी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरुन वाहत असल्याने . दि १५ ऑगस्ट स्वतंत्र दिनी शनिवार रोजी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.



सन १९९३ च्या वेळी पात्रुड येथे दंगल उसळून एक जणांचा बळी गेला होता.या घटनेमुळे पात्रुड हे बिड जिल्ह्यात अती संवेदनशील गाव म्हणून शिक्का बसला होता. मागील दोन वर्षात काश्मीर मधील कलम ३७० हाटविण्याचा कायदा,सर्वच्च न्यायालयाने दिलेला राम मंदिर निर्णय या  पार्श्वभूमीवर,या काळात पात्रुड ग्रामस्थांना शांततेचे आव्हान पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते.या पोलिसांच्या आवाहनास पात्रुड येथील ग्रामस्थांनी साथ देत शांतता राखून, एकतेचे प्रतीक दिले. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी त्यावेळी पात्रुड या गावास भेट देऊन ग्रामस्थांचे आभार मानले.यावेळी गावाजवळून गेलेल्या नदीचे खोलीकरण करून ग्रामस्थांना भेट देण्याचा त्यांनी शब्द दिला होता.त्यानुसार पोलीस प्रशासनाकडून १५ फुट खोलीकरण व १५० फुट रुंदीकरण असे ३०० मीटर काम नदी खोलीकरण रुंदीकरणाचे काम करण्यात आले.यावर्षी पावस चांगला झाल्याने खोलीकरणाचे काम करण्यात आलेल्या नदीचे पात्र भरले. असल्याने दि.१५ आँगस्ट स्वतंत्र दिनी शनिवार रोजी पोलीस अधीक्षक हार्ष पोद्दार यांच्या हस्ते खोलीकरण करण्यात आलेल्या नदीच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती डॉ.वसीम मनसबदार,गटविकास अधिकारी बी.टी.चव्हाण, माजलगांव ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील,सरपंच अँड . कजिम मनसबदार, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकवाड, माजी सरपंच नजीर कुरेशी, बाळासाहेब काळे, तुषार माने,तौफिक शेख यांच्यासह ग्रामस्थ, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
close