shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कंटेन्मेंट झोनमध्ये महिला उपसरपंचाचे बर्थडे सेलेब्रेशन ... ,खेड तालुक्यात झाला गुन्हा दाखल.



राजगुरूनगर / प्रतिनिधी ) विद्याधर साळवे:

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना नागरिकांसह लोकप्रतिनिधींना अजून देखील परिस्थितीचे गांभीर्य आहे की नाही ? अशी एक घटना खेड तालुक्यात समोर आली आहे . खेड तालुक्यातील शिरोली गावात आतापर्यंत १० कोरोना रुग्ण सापडल्याने हा परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.मात्र असे असतानाच गावातील महिला उपसरपंचाने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायत कार्यालयात केक कापून वाढदिवस धडाक्यात साजरा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .



जया काळूराम दजगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव असल्याचे समजते. त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून 188 कलम अंतर्गत महिला उपसरपंच यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते. गावात कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण असताना उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले त्यात काहींनी तोंडाला मास्क घातलेला तर काहींनी मास्क न घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला.
 

शिरोली गावात कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण गावात असताना शिवाय कंटेन्टमेंट झोन असताना हा वाढदिवस साजरा केल्यानंतर शिरोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थिगळे,विजय सावंत, संदीप वाडेकर, सोनल सावंत , उर्मिला सावंत यांनी खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायत कार्यालयात केक कापून केलेल्या बर्थडे सेलिब्रेशन ची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच या बर्थडे सेलिब्रेशन साठी उपस्थित असलेल्या ग्रामसेवकावर जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
close