मुरूड । प्रतिनिधी ( विकास मेहेतर )➤
प्रभाकर पाटील एज्युकेशन माध्यमिक शाळा वडवली तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड शाळेतील कुमारी दीपाली काशिनाथ खोपकर या आदिवासी समाजाच्या विद्यार्थिनीने एस.एस.सी. परीक्षेत 77.80% टक्केगुण मिळवून परिस्थिवर मात केली.
दीपाली खोपकर ही कुडकी आदिवासी वाडीतील आदिवासी समाजाची विद्यार्थिनी आहे . घरातील परिस्थिती अत्यंत बिकट त्यातच वडिलांचे छत्र हरविलेले त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी आई सीताबाई हिच्यावर पडली , आपण स्वतः शिक्षण घेऊ शकलो नाही मात्र आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे ही इच्छा आईच्या मनात होती . म्हणून तिने दिवस रात्र काबाड कष्ट करून दिपलीला शिकविले , दिपलीला सुद्धा परिस्थितीची जाणीव असल्याने सुट्टीच्या दिवशी दीपाली मोलमजुरी करत असे,
मुळात हुशार असल्याने व परिस्थिती गरीब असल्याने श्री धवल तावसाळकर व त्यांच्या मित्र मंडळाच्या हेल्प ग्रुप ने तिला दत्तक घेतले व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली , याची जाणीव ठेवून आपण त्यांच्या उपकाराची परतफेड जास्त गुण मिळवून करायची ही जाणीव तिच्या मनात असे. नुकत्याच झालेल्या एस.एस.सी.मार्च 2020 च्या परीक्षेत 77.80% टक्के गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाली व शिक्षणाला परिस्थिती आडवी येत नाही हे तिने दाखवून दिले
शाळेमध्ये नम्र व प्रामाणिक विद्यार्थिनी असल्याने शाळेतील सर्व शिक्षकांची आवडती होती त्यामुळे शिक्षक व वर्गातील मैत्रिणी तिला सहकार्य करत. एस.एस.सी. परीक्षेत यश संपादन केल्याने आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.यापुढे तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली शाळेतील शिक्षक व हेल्प ग्रुपने केलेल्या मदतीमुळे आदिवासी समाजाने आभार मानले.
एस.एस.सी. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल पी.एन.पी.संस्थेच्या कार्यवाह सौ.चित्रलेखा पाटील मॅडम शाळा समिती अध्यक्ष श्री चंद्रकांत बिराडी सर व सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक श्री नितीन मोकल सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .