shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर प्रकाश आंबेडकर यांचे आंदोलन मागे...!!

प्रतिनिधी । मोहन शेगर..!!
पंढरपूर :- राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तसेच विश्व वारकरी सेवाकडून आज हजारोंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात येत होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंबेडकर यांनी पंढरपुरातील आंदोलन मागे घेतले आहे. तसेच 15 जणांसोबत जाऊन त्यांनी विठ्ठलाचे दर्शनही घेतले.

राज्य सरकारने मंदिर, मशीद, बुध्दविहार सुरु केले जातील असे आश्वासन दिले असून त्यासाठीची नियमावली तयार करण्यासाठी सरकारला 8 दिवस लागतील. मात्र धार्मिक स्थळे उघडण्याचा आदेश आला नाही तर पुन्हा पंढरपुरात येऊ. लोकभावनेचा आदर केल्याबद्दल सरकारचा आभारी असून वंचितच्या आंदोलनाला यश आले आहे.

दरम्यान, 85 टक्के लोक बरे झाले आहेत तर मग घाबरायचं कशाला.? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना केला.
close