shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट संबंध म्हणजे रक्षाबंधन - आत्माराम महाराज कुमठेकर

उदगीर । प्रतिनिधी :
दरवर्षी येणारा भावांनी बहिणीचा एकत्र येऊन साजरा केला जाणारा आनंद निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय.  रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते बहिण सासरी जरी असली तरी रक्षाबंधन साठी आपल्या माहेरला येते जरी येता आलं नाही तर भाऊ आपल्या बहिणीसाठी आपल्या गावाहून बहिणीच्या गावाकडे जातो आणि बहिणीला एक आनंदाची मिठी मारून बहिणीच्या हातातून राखी बांधून, बहिणीचे दर्शन घेतो तेव्हा हातातील रक्षणाचा धागा पाहून भाऊ आनंदाने बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे देतो किंवा कोण ते तरी वस्तू घेऊन देतो आणि आपल्या बहिणीला एकदा आनंदाने डोळे भरुन पाहतो.





पुन्हा आपल्या गावाकडे गेल्यावर बहिणीच्या राखी ची खरी किंमत त्याला कळते.ज्याला बहीण असेल त्याला काहीच वाटत नाही,पण बहिण  नसलेल्या भावाला दुःख विचारा..किती मोठे  दु:ख असते ते..!! ज्याला पाय नाही त्याला पाहिजे तर  दुःख विचारा तशीच गत बहिण नसलेल्यांची  असते,तसेच बहिण असेल तर त्या बहिणीची किंमत प्रत्येकाला कळते. आता फक्त रक्षाबंधनला सुद्धा त्या बहिणीच्या डोळ्यांमधून अश्रू येतात ज्या बहिणीचा भाऊ आपल्या सर्वांच्या  रक्षणासाठी त्या सिमेवर थांबला आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी हे सुद्धा खूप काम करत आहे. त्यांना जनसेवा करत असताना बहिणीकडे जाण्यास  वेळ भेटत नाही, त्यांची पण बहीण खूप वाट बघते पण आपल्यासाठीच काम करणाऱ्या भावांचें जगाविषयी प्रेम पाहून तिला राखी बांधण्यापेक्षा अत:करण्यातून खूप आनंद होतो.  रक्षाबंधन पासून बैलपोळा पर्यंत  रक्षाबंधन चालत असते. त्यामध्ये कधीही भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहिण भावाकडे येते आणि राखी बांधण्याचे पविञ काम पार पाडते आणि  आनंदाने एकमेकांकडे पाहून रक्षाबंधन सण साजरा होतो. या दिवशी सर्व भारतामधील बहिणींना शत शत प्रणाम आणि त्या वीर जवानांना पोलीस कर्मचाऱ्यांना, डॉक्टर,सेवक या सर्वांनाच या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा..!!
close