shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवरायांचा पुतळा हटवणाऱ्याचा बोलावता धनी जगाने पहिला आहे - अर्जुन खोतकर

जालना / प्रतिनीधी:
दि.०९,कर्नाटक मधील  बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपाने हटवल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमधून संतापाची लाट पसरली होती तसेच राज्याचे राजकारण सुद्धा चांगलेच तापले होते. यावर आता माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे.

मा. मंत्री अर्जुन खोतकर



शिवाजी महाराजांचा पुतळा हटविणारे बोलावते धनी कोण आहेत? तर निश्चितपणे जगाने बघितलं, तिथे भाजप सरकार आहे. त्यांच्या इशाऱ्यावर हे चाललेलं आहे. भाजपचे लोक त्या भागात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा पद्धतीने अपमान करु लागले आहेत अशी टीका माजी मंत्री, शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे.

अंत्यत गंभीर, संतापजनक आणि चीड आणणारी ही घटना आहे. आमचं आराध्य दैवत, देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अशा प्रकारची हिंमत त्या भागातील नागरिकांची होत असेल तर त्याचे परिणामसुद्धा त्यांना भोगावे लागतील असा इशारा कोतकर यांनी भाजपाला दिलेला आहे.
close