shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाकाळात ठेवले मानुसकीचे भान, केले आहोरात जीवाचे रान !म्हणूनच शिंदेंसह, हिरेंना मिळाला आदर्श अधिकारी पूरस्काराने सन्मान !!



शिर्डी (प्रतिनिधी) - राहाता तालुक्यात कोरोना संकटावर मोठे यशस्वी काम करणारे व  कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवणारे तथा महसूल क्षेत्रातही मोठे यशस्वी कार्य मार्गी लावणारे शिर्डीचे कर्तव्यदक्ष उपविभागीय (प्रांत) अधिकारी गोविंद शिंदे यांना आदर्श प्रांताधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे,तसेच आपल्या कार्येक्षेत्रात महसुली कामकाज जिल्ह्यामध्ये अव्वल दर्जाचे केल्यामुळे तसेच शासनास महसूल मिळवून देणेकामी, शासकीय वसुली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 125 टक्के झाली असून पुरवठा कामकाजामध्ये राहाता तालुका अव्वल राहिला आहे, त्याप्रमाणे राहाता तालुक्यात सातबारा संगणीकरण सर्वत्र झाले असून राहाता तालुक्यातील विविध योजनांचे लाभार्थींना वेळेवर अनुदान देण्यात आले आहे, व ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली आहे, त्याचप्रमाणे राहाता तालुक्यात व शिर्डी उप विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या राहाता व कोपरगाव तालुक्यातही नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन व कामकाज यामध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांना हा आदर्श पुरस्कार देण्यात आला आहे.  

राज्यात, अहमदनगर जिल्ह्यात, उत्कृष्ट कामकाज केल्यामुळेच हा पुरस्कार मिळालेला आहे,
राहाता तालुक्याचे मनमिळावू ,शिस्तबद्ध व अहोरात्र कोरोनाच्या काळात काम करणारे प्रामाणिक असे तहसीलदार कुंदन हिरे यांना आदर्श तहसीलदार म्हणून पुरस्कार घोषित झाला आहे, त्यामुळे सर्व राहाता तालुक्यातून प्रांताधिकारी गोविंद शिंदे व राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांचे अभिनंदन होत आहे,
 राहाता तालुक्यात कोरोना काळात  दोन्ही अधिकाऱ्यांनी अहोरात्र, जीव धोक्यात घालून मोठे प्रयत्न केले व करत आहेत, त्यामुळे राहाता तालुक्यात कोरोना बाधीतांची  संख्या कमी आहे ,त्याचप्रमाणे राहाता तालुक्यात महसूल विभागात मोठे यशस्वी काम झाले आहे, या सर्वांची दखल घेऊन प्रांताधिकारी गोविंद शिंदे  व राहाता तालुक्याचे मनमिळावू तहसीलदार कुंदन हिरे यांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले आहे, त्यामुळे राहाता तालुक्यातील सर्व नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.

चांगल्या, व प्रामाणिक अधिकाऱ्यांनाया पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल शासनाचेही अभिनंदन होत आहे, राहाता तालुक्यातील तहसीलदार कुंदन हिरे यांनी सर्व शासकीय यंत्रणेला शिस्तबद्ध करण्याचे काम केले आहे ,त्यामुळे राहाता तालुक्यात मोठी शिस्त लागली आहे, राहाता तालुक्यातील  शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे हे कोरोना काळात अहोरात्र काम करत आहेत, त्यामुळेच शिर्डी राहाता व तालुक्यात कोरोनाला मोठा आळा बसला आहे, त्याचप्रमाणे  कोरोना बाधित व्यक्तींना  शिर्डीच्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये किंवा लोणीच्या केअर सेंटरमध्ये  मोठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले आहे , तसेच  कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात  ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्याकडेही आरोग्य तपासणी,योग्य आहार ,योग्य व्यायाम याकडेही त्यांचे मोठे लक्ष होते,  शिर्डीच्या  कोव्हीड केअर सेंटरमध्ये  भजन संध्याचा कार्यक्रम घेऊन  त्यांनी  राज्यातही इतर कोअर सेंटरमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे,  त्याचप्रमाणे  त्यांनी  शिर्डी व परिसरात  कोरोनासाठी  विविध  निर्णय घेऊन यास आळा बसण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत व करत आहेत, हे करत असताना ते स्वतःहून  कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत, त्यामुळे ते राहाता तालुक्यातील नागरिकांना आपले अधिकारी म्हणून वाटतात, प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांचे उत्कृष्ट काम बघूनच अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी  यांनी  या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोठे कौतुक केले आहे, तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या  प्रामाणिक व उत्कृष्ट  कामामुळेच  प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांना आदर्श म्हणून पुरस्कार रक्षाबंधन या  सणाच्या दिवशी मिळालेला आहे ,त्याबद्दल त्यांचे सर्वच स्थरातून मोठे अभिनंदन होत आहे.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे  व राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांचे नागरिकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे, व सर्व स्थरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे, राहाता तालुक्यात प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी सर्व शासकीय कर्मचारी व नागरिक यांच्याशी उत्तमरित्या समन्वय साधून कोरोनाच्या संकटकाळात अहोरात्र प्रयत्न करून कोरोनाला कसा आळा घालता येईल, यासाठी मोठे प्रयत्न केले ,त्याचप्रमाणे राहाता तालुका ,कोपरगाव तालुका, शिर्डी, मध्येही महसुली तसेच अन्नधान्य पुरवठा विभाग व इतर सर्व विभागात स्वतः लक्ष घालून सर्व कामकाज व्यवस्थित व्हावे यासाठी मोठे प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचे राहाता तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहेत.
close