shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लातूर शहरात भाजपा महिला मोर्च्याच्या वतीने कोरोना योद्धाचा सन्मान...!!




लातूर शहर महानगरपालिका.

लातूर प्रतिनिधी । रवि बिजलवाड :

ऑगस्ट ०४
लातूर शहर  : COVID महामारीच्या काळात स्वतः च्या आरोग्याची काळजी न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांसाठी घरातून बाहेर पडून अहोरात्र काम करणाऱ्या कोरोना योद्धाना भाजपा महिला मोर्चा च्या महिलांनी राखी बांधून सन्मान पत्र देऊन त्यांचा गौरव केला. गांधी चौक पोलिस स्टेशन येथे पोलीस बांधवांना, CRPF बांधवाना, डॉक्टर, महानगरपालिका येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना , पत्रकार बांधवाना, बँक कर्मचारी, विश्व सुपर मार्केट येथे किराणा वितरण करणाऱ्या डिलिव्हरी बॉय, ट्रॅफिक पोलीस शिवाजी चौक येथे, तसेच प्रमोद गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना ,भाजी विक्रेत्यांना राखी बांधून गौरव पत्र देण्यात आले. 

यावेळी जेष्ठ मार्गदर्शिका ॲड. जयश्री ताई पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मीनाताई भोसले, सरचिटणीस शोभाताई कोंडेकर, प्रगती डोळसे, ज्योती रसाळ, मनीषा रेनापूरकर, छाया जाधव, अफ्रिन खान,अपंग आघाडी च्या संयोजिका ज्योती मारकडे आदी पदाधिकारी यांनी रक्षाबंधनानिमित्त कोरोना योध्दाना भाजपा महिला मोर्चा च्या वतीने राखी बांधून व सन्मान पञ देऊन गौरवण्यात आले. हा सोहळा मीना भोसले,भाजपा महिला मोर्चा लातूर शहर  यांच्यावतीने पार पडला.
close