shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्यांना नाही कुणी, त्यांना आहोत आम्ही... लातूर पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले...!!



लातूर। प्रतिनिधी : रवि बिजलवाड

जुलै २७ / लातूर शहर :
लातूर पोलीस दलाचे पो.उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी स्वतः पुढाकार घेत नांदेड रोड वर एका अनोळखी व्यक्तीची मृत्यू झाल्यानंतर त्याची ओळख पटली नाही.



तेव्हा लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक चेरले यांनी पुढाकार घेऊन त्या अनोळखी  मृत व्यक्तीचे धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार केले. ज्यांना नाही कुणी,त्यांना आहोत आम्ही, महाराष्ट्र पोलिसांनी हे दाखवून देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. गरीब, निराधार, वंचित नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणाऱ्या चेरले यांच्यासह हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी खाकीचा सन्मान वाढविला आहे.हि बाब महाराष्ट्रासाठी भुषणावह आहे हे विसरून चालणार नाही.
close