shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हे तर गलिच्छ राजकारण...' सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया..!!



सुशांत सिंह प्रकरणात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे

मुंबई, 4 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर विविध तर्कवितर्क केले जात असताना आता या प्रकरणात राजकारणाचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते नारायण राणे सुशांत सिंह प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन ही हत्या असल्याचा दावा केला आहे व शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर आरोप केला आहे.
यामध्ये शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक नोट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी हे गलिच्छ राजकारण असल्याचे नमूद केले आहे. आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
 
आदित्य ठाकरे यांनी सुशांत सिंह प्रकरणात लावण्यात आलेल्या आरोप फेटाळले असून हे गलिच्छ राजकारण असल्याचे वक्तव्य केलं आहे. मुंबईतील बॉलिवूड हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. यामध्ये अनेकांनी चांगले संबंध आहे. याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. याबाबत त्यांनी सविस्तर नोट लिहिली असून ती ट्विट केली आहे.
close