shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एस.टी. बस सेवा तातडीने सुरू करा- अ‍ॅड. डॉ.अरुण जाधव..!!

जामखेडमध्ये एस.टी. डेपो समोर वंचित बहुजन आघाडीचे डफली बजाव आंदोलन...!!


जामखेड । प्रतिनिधी ( मोहन शेगर )➤   सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेली एस.टी. बस सेवा तातडीने सुरू करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्यावतीने यापुढे व्यापक स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेडच्या एस.टी.डेपोसमोर डफली बजाव आंदोलन करण्यात आल्यानंतर आगार व्यवस्थापकशिरसाठ यांना निवेदन देतांना अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव समवेत बापू ओहोळ, विकी सदाफुले, पोपटराव फुले, अतिष पारवे व इतर कार्यकर्ते.



एस.टी. बस सह सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत कराव्यात या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड येथील एस.टी. बस डेपो समोर डफली बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत, बापू ओहोळ, विकीभाऊ सदाफुले, पोपटराव फुले, विशाल पवार, अतिष पारवे, योगेश सदाफुले, अंकुश पवार, किरण जावळे, सुनिल साळवे, भीमराव चव्हाण, विशाल समुद्र, वैजिनाथ केसकर, संतोष चव्हाण, राकेश साळवे, रोहित भालेराव, अजिनाथ शिंदे, दादा गायकवाड, नानाभाऊ सावंत, बाबासाहेब चव्हाण, भीमराव चव्हाण, पप्पू सदाफुले, प्रेम आव्हाड, अमोल गायकवाड, लक्ष्मण सदाफुले आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी बोलतांना अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव म्हणाले की, कोरोना महामारीचे संकट व त्यामुळे लादण्यात आलेल्या लॉक डाऊनमुळे देशाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे कोलमलडी आहे.बारा बलुतेदार, अठरा आलुतेदार यांच्यासह, चहावाला, रिक्षावाला, फळे व भाजी विक्रेता, फेरीवाला अशा छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांची उपासमार होत आहे.अशा परिस्थितीत राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा पूर्ववत सुरू व्हावी. तसेच इतरही सार्वजनिक वाहतूक सेवा सुरळीतपणे सुरू व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकिभाऊ सदाफुले, अतिष पारवे, पोपटराव फुले, विशाल पवार, यांचीही भाषणे झाली. प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत यांनी निवेदनाचे वाचन केले. यावेळी एस.टी. डेपो समोर डफली वादन करण्यात आले. बापु ओहोळ यांनी प्रास्ताविक केले.भगवान राऊत यांनी सूत्रसंचालन केले. अतिष पारवे यांनी आभार मानले. जामखेड एस.टी. डेपोचे मॅनेजर शिरसाठ यांना निवेदन देण्यात आले.


close