सोनई । प्रतिनिधी (मोहन शेगर):
जामखेड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर युवराज खराडे यांची कोरोना महामारी च्या काळात अचानक झालेली बदली ही त्यांच्यावर अन्याय करणारी आहे, याबद्दल जामखेडकर यांनी तीव्र शब्दात विरोध नोंदविला आहे.
त्यांची बदली करण्यात आलेली असून त्यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲड. डॉ.अरुण जाधव यांनी केली आहे. डॉक्टर युवराज खराडे यांनी कोरोनाच्या काळामध्ये जामखेड तालुक्यातील जनतेची गेल्या सहा महिन्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करीत आहेत, त्यांच्या प्रयत्नामुळे जामखेड तालुक्यातील अनेक रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
असे असताना देखील त्यांची अचानक झालेली बदली ही राजकीय दबावाखाली झाली असण्याची शक्यता आहे,असे मत ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केले, डॉक्टर युवराज खराडे यांच्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आलेले आहेत, तसेच त्यांच्याबद्दल चुकीच्या खोट्या तक्रारी व दिशाभूल करणारी माहिती राजकीय जबाबदार पदाधिकाऱ्यांना देण्यात आली असुन ते सध्या कामाच्या दगदगीमुळे आजारी होते.त्यांना सलाईन लावले होते तरी देखील त्यांच्याबद्दल चुकीची माहिती देण्यात आली कारण काय आहे तर ते फक्त बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, म्हणून भावांनो आणि बहिणींनो तुम्ही सांगा ज्या व्यक्तीला सलाईन चालू आहे तो व्यक्ती बैठकीला हजर राहू शकतो का? त्यामुळे या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही.
जामखेड तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, जनतेला मोठा आधार देण्याचे काम कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर युवराज खराडे यांनी केले आहे,त्यांचे हे काम अत्यंत जामखेड तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी निगडित आहे.
त्यांची झालेली बदली जामखेड ची जनता सहन करणार नाही त्यामुळे त्यांची बदली तात्काळ रद्द करावी.
अन्यथा जिल्हा प्रशासनाला जनतेचा रोष ओढवून घ्यावा लागेल. त्याची तयारी जिल्हा आरोग्य प्रशासनाने ठेवावी. तसेच जामखेड येथील सर्व जनता हुशार व सुज्ञान आहे ,तरी डॉक्टर युवराज खराडे यांच्यासारख्या हुशार इमानदार व प्रामाणिकपणे व रात्रं दिवस जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या अधिकार्यांवर होणारा अन्याय जामखेडची जनता सहन करणार नाही.

