shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवसेनेचे उपनेते माजी मंञी अनिलभैया राठोड यांचे निधन..!!



नगर । प्रतिनिधी :

नगर – शिवसेनेचे कट्टर समर्थक तथा उपनेते माजी मंत्री अनिलभैय्या राठोड याचं आज सकाळी ०६.३० च्या दरम्यान वयाच्या ७३ व्या वर्षी ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले . 

अनिल राठोड हे नगरचे एकेकाळचे लोकप्रिय लोकनेते ठरले, त्यांचा धबधबा सर्व दूरवर पसरला होता.सर्व घटकातील वंचितांना न्याय देणारा लोकप्रिय लोकनेता म्हणून त्यांचे प्रस्थ होते. स्व: बाळासाहेब ठाकरे हे अनिल राठोड यांना नगर जिल्ह्यातील खास विश्वासू मानत असत. नगर मध्ये शिवसेना वाढवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या पायाभरणीचे मोलाचे काम करून अखेरच्या श्वासापर्यंत कळस पुर्ण होईपर्यंत टिकून काम करत राहिले. त्यांच्या सुरूवातीच्या कामाची दखल घेत १९९० साली त्यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले. एक पेक्षा जास्त वेळा सलग आमदार होण्याचा विक्रम त्यांच्या नावे इतिहाजमा आहे. 

१९९० ते २०१४ पर्यंत सलग ५ वेळा सातत्याने चढत्या मताधिक्याने विजयी होणारे ते पहिलेच आमदार ठरले. त्यांची शिवसेनेवरची निष्ठा पाहून त्यांना १९९५ साली मंत्रिमंडळात घेण्यात आले.मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अनिल राठोड यांनी अन्न व नागरी पुरवठा , राज्यमंत्री म्हणून काम पहिले .त्यानंतर २०१४ ला त्यांच्या पराभव झाला परंतू शिवसेनेत अखेरपर्यंत काम करत आपला ठसा उमटवला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात त्यांनी गोरगरिबांसाठी स्वतंत्र अन्नछत्र चालवत जसे जमेल तसे अनेक ठिकाणी जीवनावश्य्क वस्तूंचा पुरवठाही केला. गेल्या आठवड्यात लोकस॔पर्कामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली. आज सकाळी  ०६. ३० च्या दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली.

अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी २ मुली, एक मुलगा, सून व जावई व नातेवाईक असा परिवार आहे.
close