shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विस्ताराधिकारी वरिष्ठ, कनिष्ठ व मुख्याध्यापक यांच्या दोन दिवसात पदोन्नती होऊनच बदल्या होणार...!!

विस्ताराधिकारी वरिष्ठ, कनिष्ठ व मुख्याध्यापक यांच्या  दोन दिवसात पदोन्नती होऊनच बदल्या होणार....

सर्व शिक्षक संधटनांच्या मागणीला यश..!!
   
लातूर जिल्हा प्रतिनिधी :
   (रवि बिजलवाड)
जुलै ०७ / लातूर शहर :विस्ताराधिकारी वरिष्ठ, कनिष्ठ व मुख्याध्यापक यांच्या दोन दिवसात पदोन्नती होऊनच बदल्या होणार..! सर्व शिक्षक संधटनांच्या मागणीला यश..!!
 लातूर जि.प.अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली व जि.प.उपाध्यक्षा भारतबाई सांळूंके मॕडम,जि.प.सभापती गोविंदराव चिलकुरे साहेब,शिक्षणाधिकारी {प्राथ.) वैशाली जामदार मॕडम यांच्या उपस्थित सर्व शिक्षक संघटनांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात आले.
१} शिक्षकांच्या बदल्या या विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक यांच्या प्रमोशन नंतरच करण्यात याव्यात,.अगोदर प्रमोशन नंतर बदली अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली होती ती मागणी आज बैठकित मान्य करण्यात आली व केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचे ठरले.
  
 २ }  DCPS बांधवांच्या कपातीचा हिशोब{ स्लीपा } सतत पाठपुरावा करुनजि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षा व मुख्यलेखा व वित्त अधिकारी यांनी DCPS बांधवांना स्लीपा { हिशोब } दिल्याबद्दल अभिनंदनांचा ठराव घेण्यात आला. तसेच ज्या DCPS बांधवांच्या कपातीच्या हिशोब अपुर्ण आहे. त्यांच्या त्रुटीची दुरुस्ती ताबडतोब करण्याचे ठरले.
 ३ } शिक्षकांचे मासीक जी.पी.एफ हप्ते जमा करण्यात दिरंगाई करुन शिक्षक बांधवांच्या व्याजाचे नुकसान केलेल्या संबधीत अधिकारी कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे सर्वानुमते ठरले.
४ } प्रमोशनची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर बदली प्रकीये संदर्भात पुन्हा संघटनांची बैठक घेऊन २७/ २ चा शासन निर्णयानुसार बदली प्रक्रीया पुर्ण करण्याचे ठरले.

वरील धोरणात्मक निर्णय शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन घेतल्या बद्दल जि.प.चे अध्यक्ष राहुल भैय्या केंद्रे साहेब,उपाध्यक्षा सौ.भारतबाई सांळुके मॕडम,सभापती गोविंदराव चिलकूरे साहेब शिक्षणाधिकारी वैशाली जामदार,मुख्यलेखा व वित्त अधिकारी जवळगेकर साहेब यांचे अभिनंदन करताना शिक्षक प्रतिनीधी सभा { शिक्षक काॕंग्रेस } संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जे.जे.गायकवाड, जिल्हाध्यक्ष केशव भैय्या गंभीरे,अ.भा.शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल कुमार हाके,आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष चंदु घोडके,काॕस्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के,शिक्षक सेनेचे बाळासाहेब येळापुरे,जूनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सोमवंशी जनक्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव,जिल्हा संघटक हेमंतजी टेंकाळे उपस्थित होते.
close