shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वन्यप्राण्यांकडून मनुष्यहानी वा पशुधनहानी झाल्यास मिळणा्रया सहाय्य रकमेत शासनाने केली मोठी वाढ..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी)
राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने  सध्या राज्यात ठिकठिकाणी वन्य प्राण्यांकडून मनुष्य आणि पशुधनावर अचानक बेसावध असताना हल्ले होत असून यात मनुष्याहानी किंवा पशुधनहानी होत असुन या संदर्भात राज्य शासनातर्फे अशा व्यक्ती किंवा पशुधनहानी झालेली असल्यास त्यांना सहाय्य करते. मात्र ही आर्थिक मदत  त्यादृष्टीने फारच कमी होती.ती आता वाढवण्यात आली आहे.त्यामुळे जर वन्यप्राण्यांनी मनुष्यहानी किंवा पशुधनहानी झाल्यास अशा वेळी राज्य शासनाकडुन आता वाढीव आर्थिक सहाय्य करण्यात येणार असून त्याचे परिपत्रक नुकतेच शासनाने जाहीर केले आहे. 

त्यामुळे ग्रामीण भागातील, व वन विभागात ,रानावनात, किंवा कुठेही राज्यात राहणाऱ्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने महसूल व वन विभागा च्या वतीने राज्यातील डोंगरदऱ्यात किंवा शेतामध्ये किंवा  राज्यातील सर्व ठिकाणी राहणाऱ्या वाघ ,बिबट्या ,अस्वल, गवा ,रान ,डुक्कर ,लांडगा, तरस, कोल्हा,मगर, हत्ती ,रानकुत्रे ,आदी वन्यप्राण्यांकडून जर अचानकपणे हल्ला करून मनुष्यहानी किंवा पशुधन हानी झाली तर राज्य शासनाच्या वन व  महसूल विभागामार्फत आता अशा वेळी आर्थिक सहाय्य वाढून मिळणार आहे. जर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये  व्यक्ती मृत झाल्यास त्यास शासनातर्फे दहा लाख रुपये देण्यात येणार आहे.

मृत व्यक्तीच्या वारसदाराला तात्काळ तीन लाख रुपये धनादेशाद्वारे देण्यात येऊन सात लाख रुपये या वारसदाराचे खाते असलेल्या राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवी स्वरुपात ठेवण्यात येणार आहेत.तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्तीला कायम अपंगत्व आले तर त्यास पाच लाख रुपये मिळणार आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात  एखादी व्यक्ती गंभीर रित्या जखमी झाली तर तिला एक लाख पंचवीस हजार रुपये मदत मिळणार आहे.शिवाय जर एखादी व्यक्ती अशा हल्ल्यात किरकोळ जखम झाली तर त्या व्यक्तीचा औषध उपचार खर्च किंवा खाजगी रुग्णालयात आवश्यकता असल्यास दाखल करण्याची वेळ आली तर अशा व्यक्तीला वीस हजार रुपये मदत मिळणार आहे. 

त्याच प्रमाणे वन्यप्राण्यांकडून गाय ,म्हैस, बैल, यांचा मृत्यू झाल्यास या प्राण्यांच्या बाजारभावकिंमती पेक्षा 75% रक्कम  किंवा 40000 यापैकी कमी असणारी रक्कम म्हणून मदत मिळणार आहे.जर वन्यप्राण्यांकडून गाय, म्हैस, बैल यांच्यावर हल्ला झाला व ते कायमचे अपंगत्व झाले तर बाजारभावापेक्षा 50 टक्के रक्कम किंवा रोख.12000 या पाळीव प्राण्यांच्या मालकाला दिले जाणार आहेत.तसेच वन्यप्राण्यांकडून मेंढी ,बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास दहा हजार रुपये मिळणार आहे. व सर्व पाळीव जनावरांना वन्यप्राण्यांकडून हल्ल्यात जखमी झाले तर अशा पाळीव प्राण्यांच्या मालकाला बाजार भावाच्या 25 टक्के रक्कम किंवा चार हजार रुपये ही या दोन पैकी कमी आहे ती रक्कम औषधोपचारासाठी त्या प्राण्याला  मालकाला दिले जाणार आहे.

ही सर्व  मदत  महसूल व वन विभागामार्फत देण्यात येणार असून यामध्ये यावर्षी मोठी वाढ करण्यात आलेली आहे.या वाढीव रक्कमे मुळे आता नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.ही वाढीव आर्थिक रक्कम महसूल व वन विभागाचे मुख्य वनरक्षक विरेंद्र तिवारी, मंत्रालय, मुंबई. यांनी आपल्या सहीनिशी परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
close