shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी व सावळीविहीर परिसरात कोरोनामुळे बैलपोळा सण साध्या पद्धतीने पण उत्साहात साजरा..!!


सावळिविहीर(प्रतिनिधी) :
कोरोनामुळे यावर्षी पोळा सणावर मोठे सावट आल्याचे दिसून येत होते.राहता व शिर्डी ,सावळीविहीर परिसरात कोरोणा मुळे बैलपोळा हा सण उत्साहात पण अगदी घरगुती व  साध्या पद्धतीने साजरा झाला. कुठेही मिरवणुका व शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली नाही. पोळा सणाच्या निमित्त आज सकाळी शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना, गायांना व पाळीव प्राण्यांना स्वच्छ धुऊन काढत त्यांच्या शिंगांना रंग दिला, तसेच अंगावरही रंगांनी वेगवेगळे नाव काढून चिन्हे काढून कोरोणा संदर्भातही जागृती करण्यात आल्याचे दिसून येत होते.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना घुंगरमाळा, बेगडी लावून सजवले होते ,फुगे लावून बैलांना सुंदर सजवून त्यांना यावर्षी मात्र दरवर्षाप्रमाणे गावात, मंदिरांमध्ये मिरवणुकीने आणले जात नव्हते.

 एखादी बैल जोडी किंवा बैल शांत शांत गावात येताना व दर्शन करून परत घरी जाताना दिसत होता.कोरोणामुळे यावर्षी बैलपोळ्याला मोठा गाजावाजा दिसला नाही.शेतकऱ्यांनी आपल्या बळीराजाला घरीच सजवून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अगदी साध्या पद्धतीने पण उत्साहात  हा सण साजरा केला. बळीराजाला ओवळून त्याला नैवेद्द देत त्याचे औक्षण करण्यात आले व वर्षभर असेच आम्हाला शेतीकामांमध्ये साथ दे म्हणून बळीराजाला व देवांना साकडे घालण्यात आले, यावर्षी मात्र कोठे बैलपोळ्याच्या मिरवणुका निघाल्याचे दिसले नाहीत. इतर सणाप्रमाणे कोरोणामुळे बैलपोळा ही यावर्षी शांततेत साध्या पद्धतीने पण aघरोघरी उत्साहात साजरा झाला, तसेत दरवर्षाप्रमाणे  काही गावांमध्ये  ट्रॅक्टराची  सजवून मिरवणूक काढण्यात येत असते. मात्र यावर्षी कोरोनामुळे ही ट्रॅक्टरांची मिरवणूक कुठे दिसून आली नाही.

यावर्षी बैलपोळ्याला मातीचे बैल पूजनासाठी  मिळणे मुश्किल झाले होते.यावर्षी कोरोनामुळे मातीचे बैल बनविण्याचे कामही अगदी संथ व कमी प्रमाणात झाले होते.त्यामुळे बाजारातही किंवा रस्त्यावरही मातीचे बैल विक्री करताना कुणी दिसून येत नव्हते. त्यामुळे घरोघरी मातीचे बैलाचे पूजन करण्यासाठी मोठे प्रयत्न करून किंवा कुंभारा कडे जाऊन मातीचे बैल घेऊन यावे लागत होते.असे चित्र या वर्षी दिसून आले. या बैलपोळ्याच्या सणा निमित्त राहता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे, सावळीविहीर येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी गणेश कापसे यांनी सांगितले की, या वर्षी कोरोनामुळे बैलपोळा हा सण अगदी साध्या पद्धतीने व शासनाचे नियम पाळून करण्यात येत असल्यामुळे कुठे ही गर्दी नव्हती.तसेच कैलास सदाफळ यांनीही यावेळी कोरोनामुळे हा सण अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

अनेकांनी आपली बैले सजवली मात्र घरीच पूजन करून नैवेद्य दाखवून हा सण साजरा केला. तर काहींनी गर्दी न करता फक्त आपले बैल घेऊन गावातून एक चक्कर मारत घरी पूजन केले. कोरोनामुळे बैलपोळा हा सण इतर सणा प्रमाणेच उत्साहात पण साधेपणाने साजरा झाला.
close